वाकड परिसरातील शाहरूख खान टोळीवर मोक्का…
वाकड परिसरातील शाहरूख खान टोळीवर मोक्का…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – वाकड, हिंजवडी आणि खडकी पोलिस ठाण्यात १५ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या वाकड परिसरातील सराईत गुन्हेगार शाहरुख शेख/खान टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. शाहरुख खान आणि त्याच्या साथीदारांनी ३ मार्च रोजी एका दांपत्यास टेंपोने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. महिला पोलिसांची खबरी असल्याच्या संशयावरून अपघाताचा बनाव करून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
(दि.०३मार्च) रोजी रात्री ०९:१५ वा. दरम्यान याकड काळा खडक येथे राहणारी महीला सौ.लता संतोषकुमार कांबळे (वय ४५ वर्षे) व तिचे पती संतोषकुमार कांबळे यांना पिकअप टेम्पोने जोरदार धडक दिल्याने लता कांबळे या मयत झाल्या होत्या तसेच त्यांचे पती हे गंभीर जखमी झाले होते. सदर घटनेबाबत वाकड पोलिस ठाण्यात अज्ञात टेम्पोचालका विरुध्द भादंवि कलम २०२४ भा.द.वि. कलम २७९,३३८,४२७,३०४ (अ) मोटार वाहन अधिनयम कलम १८४, ११९, १७७, १३२ (१) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकार हा अपघाताचा नसुन घातपाताचा संशय असल्याबाबतची गोपनीय माहीती मिळाल्यावर पोलिस उपायुक्त परी.२ बापु बांगर,सहा पोलिस आयुक्त ,वाकड विभाग डॉ.विशाल हिरे, यांनी लक्ष घालुन गुन्हयातील अज्ञात टेम्पो व टेम्पाचालकाचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करणेबाबत वाकड पोलिस ठाणेस सुचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना या घटनेबाबत परीसरातील सी.सी.टी.व्ही., प्रत्यक्ष साक्षीदार, तसेच गोपनीय बातमीदारांमार्फत माहीती प्राप्त करुन तपास करण्याबाबत सांगितले.
वाकड पोलीस ठाणेचे, पोलीस निरीक्षक गुन्हे, विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली वाकड पोलिस ठाण्याचे तपास पथकाचे पोउनि. सचिन चव्हाण, पोउनि.अनिरुध्द सावर्डे, गुन्हयाचे तपासी अधिकारी पोउनि.नागनाथ सुर्यवंशी व तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपी व अज्ञात पिकअप टेम्पोचा शोध घेण्याकामी घटनास्थळाचे आजुबाजुचे, घटनास्थळावर येण्या जाण्याचे मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सीसीटीव्ही पाहणी व तपासादरम्यान असे निदर्शनात आले की, अपघाताचे घटनेपूर्वी तीन ते साडेतीन तास अगोदर घटनास्थळाचे परिसरात एक पिकअप टेम्पो नं. एमएच १२ युएम ३८६३ हा संशयीतरित्या फिरत असल्याचे दिसुन आला. टेम्पोचे पाठीमागील व पुढील नंबर प्लेटवर नंबर अदृष्य करण्याचे हेतुने काहीतरी लावल्याचे दिसुन आले. नमुद टेम्पोचा चालक यांच्यासह गुन्हयातील आरोपी संशयास्पद हालचाली करीत असुन मयत महीला व तिचे पती येण्याचे मार्गावर आरोपी टेम्पोसह थांबलेले आढळुन आले. मयत महीला व तिचे पती हे तेथुन पायी येत असल्याचे दिसताच टेम्पोने त्यांना भरधाव वेगाने धडक देऊन महीला व तिचे पती यांना गंभीर जखमी करुन पळुन गेल्याचे सी.सी.टी.व्ही फुटेजच्या निरीक्षणामध्ये निष्पन्न झाले.
सदरचा गुन्हा हा अतिशय नियोजनबद्ध रित्या व कट केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हयामध्ये भा.दं.वि. कलम ३०२, ३०७, १२० ब, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे कलमवाढ करण्यात आली. गुन्हयाचे तपासामध्ये टेम्पोविषयी माहीती घेऊन त्यावरील चालक हा १. रोहीत नागनाथ गायकवाड (वय २३ वर्षे), रा.शिव चैतन्य कॉलनी, शेवाळवाडी, शेवाळे चौक, हडपसर पुणे याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता सदरचा गुन्हा हा त्याने अभिलेखावरील सराइत गुन्हेगार २.आनंद किशोर वाल्मिकी, (वय २९ वर्षे), रा.काळाखडक झोपडपट्टी, वाकड, पुणे ३.परशुराम- परश्या सुनिल माने (वय२४ वर्षे) रा.काळाखडक झोपडपट्टी, वाकड, पुणे यांच्या सह केल्याचे माहीती दिल्याने त्यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा अपघात नसुन अपघाताचा बनाव करुन महीला लता संतोषकुमार कांबळे यांचे सोबत असलेल्या पुर्वीच्या वादाच्या कारणावरुन तिला जीवे मारण्याचे उद्देशाने कट करुन तिचे जाण्यायेण्याच्या मार्गावर पाळत ठेवुन (दि.०३मार्च) रोजी ती तिच्या पतीसह स्वर्ण हॉस्पीटल जवळ, काळाखडक, वाकड येथुन पायी चालत येत असताना आरोपींनी टेम्पोने जोरदार धडक देऊन उडवुन तिला ठार मारुन तिचे पतीला गंभीर जखमी केल्याबाबतची कबुली दिली. नमुद आरोपींना गुन्हयात (दि.१२मार्च) रोजी अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन तपास करता गुन्हयामध्ये पाळत ठेवण्यासाठी त्यांनी एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन बालन्याय मंडळासमोर हजर केले आहे. तसेच सदरचा गुन्हा हा अटक आरोपी यांचा साथीदार पाहीजे आरोपी शाहरुख युनुस शेख रा.काळाखडक झोपडपट्टी, वाकड, पुणे याच्या सह कट करुन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दाखल गुन्हयातील आरोपीचे गुन्हेगारी रेकॉर्ड व नमुद गुन्हयातील सहभाग यावरुन नमुद आरोपी हे संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने (दि.३०एप्रिल) रोजी अपर पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड वसंत परदेशी यांची पुर्वमान्यता घेऊन दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (i) (ii), ३(२), ३(४) चा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास डॉ.विशाल हिरे, सहा.पोलीस आयुक्त वाकड विभाग हे करीत आहेत.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे. अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त परि-२, बापु बांगर, सहा. पोलिस आयुक्त वाकड विभाग, डॉ.विशाल हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुन्हे विठ्ठल साळुंखे, पोलिस निरीक्षक गुन्हे, रविकिरण नाळे, तपास पथकाचे पोलिस उप निरीक्षक सचिन चव्हाण, पोउनि.अनिरुध्द सावर्डे, पोउनि. नागनाथ सुर्यवंशी, श्रेणी पोउपनि. विभीषण कन्हेरकर, श्रेणी पोउपनि. बाबाजान इनामदार, सपोफौ, राजेंद्र काळे, पोलिस अंमलदार बंदु गिरे, प्रमोद कदम, स्वप्निल खेतले, संदीप गवारी, अतिश जाधव, दिपक साबळे, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबीले, कौतेंय खराडे, रामचंद्र तळपे, विनायक घारगे, भास्कर भारती, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, स्वप्निल लोखंडे, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.