ललित की भुषन ड्रग प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण,तपासातुन पोलिसांना नवनवीन खुलासे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पुणे – सध्या महाराष्टभर व देशभर गाजत असलेले प्रकरण म्हनजे ससुन हॉस्पिटलमधून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक रहस्यांचा
उलगडा होत आहे. राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला असुन  तपासादरम्यान भूषण पाटील हाच ड्रग्स
प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळत आहे. भूषण हा केमिकल इंजिनीअर असल्यामुळे त्याला रसायनशास्त्राचे ज्ञान होते. सध्या ड्रग्स प्रकरणात कारागृहात असलेल्या अरविंदकुमार
लोहारे याने एमडी ड्रग्स बनवण्याचे प्रशिक्षण त्याला दिले होते. तोच ड्रग्स तयार करत होता. तयार केलेले ड्रग्स विकण्याचे काम ललित पाटील करत होता, तर अभिषेक बलकवडे हा आर्थिक व्यवहार पाहत असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर
आली आहे.

दरम्यान, एमडी ड्रग्स भारतात विदेशातून येते. परंतु भूषण पाटील केमिकल इंजिनीअर असल्यामुळे आणि त्याला रसायन शास्त्राचे उत्तम ज्ञान असल्यामुळे भूषण पाटील याने ड्रग्स बनवण्यासाठी
एक टीम तयार केली होती. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना पोलिसांनी १० ऑक्टोबर रोजी
अटक केली होती,तर १८ ऑक्टोबर रोजी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नई येथुन अटक केली.





ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर आधी चाळीसगाव येथे गेला. त्यानंतर धुळ्याला पोहचला. तेथे भाड्याने गाडी घेऊन छत्रपती संभाजीनगरमार्गे गुजरातमधील जामनगर येथे पोहचला त्यानंतर सोलापूर व पुढे विजापूरवरुन कर्नाटक गाठले. कर्नाटकातून चेन्नईला जाण्याचा त्याचा बेत होता. चेन्नईवरुन तो श्रीलंकेत दाखल होणार होता. परंतु त्यापूर्वीच मुंबई पोलिसांना तो सापडला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!