
ललित पाटील ड्रग प्रकरणात नवीन अपडेट,गिरणा नदीच्या पात्रात फेकलेले ड्रग पोलिसांनी केले जप्त…
मुंबई – महाराष्ट्ररभर गाज असलेले ललित पाटील MD ड्रग प्रकरणात आणखी एक अपडेट आली आहे ,ड्रग्ज माफिया ललित पाटील सध्या पोलिस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटीलला अटक केली होती. यामध्ये आता ललित पाटील याच्या साथीदारांनी नदीपात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
ललित पाटील याचा चालक सचिन वाघ हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने ड्रग्सचा मोठा साठा नदीपात्रात फेकल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले होते. सचिन वाघ याने फेकलेला ड्रग्ससाठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने शोधकार्य सुरू केले होते नाशिक सटाणा रस्त्यावरील लोहनेर ठेंगोडा गावातील गिरणा नदीपात्रातून कोट्यावधी रुपयांचा ड्रग्सचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा साठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तब्बल ३ ते ४ तास अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केले. रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरच्या मदतीने १५ फूट खोल नदीपात्रात रात्रीच्या अंधारात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.


सचिन वाघ याने तब्बल दोन गोण्या भरून ड्रग्सचे पॅकेट नदीपात्रात फेकले होते. जप्त करण्यात आलेल्या ४० ते ५० किलो ड्रग्सच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १०० कोटींच्या घरात आहे. तसेच देवळाजवळच्या सरस्वतीवाडी भागातून देखील १५ किलो ड्रग्स जप्त केल्याची माहीती आहे



