
मुंब्रा पोलिसांनी 24 तासात केला खुनाचा उलगडा…
मुंब्रा पोलिसांनी 24 तासात केला खुनाचा उलगडा…


ठाणे शहर (प्रतिनिधी) – मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा, कौसा, आंबेडकरपाडा, डोंगरभागात अल्पवयीन मुलाचा खुनाचा 24 तासात उलगडा करुन आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी – बिजलउद्दीन मंन्सुरी (वय 55 वर्षे), रा-रुम नं.703, रेहानबाग, बिल्डींग, बि/विंग, सातवा माळा, देवरीपाडा, श्रीलंका कौसा मुंब्रा, जि.ठाणे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गु.र.नं.1451/2024 भादवि कलम 363,302,201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (दि.08जुन) रोजी रात्री फिर्यादी नामे बिजलउद्दीन मंन्सुरी (वय 55 वर्षे), रा-रुम नं.703, रेहानबाग, बिल्डींग, बि/विंग, सातवा माळा, देवरीपाडा, श्रीलंका कौसा मुंब्रा, जि.ठाणे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली कि, (दि.06जून) रोजी सायंकाळी 06.00 वा.चे. सुमारास त्यांचा अल्पवयीन मुलगा नामे मेहताब बिजलउद्दीन मंन्सुरी (वय 15 वर्षे), रा.ठी रुम नं. 703, रेहानबाग, बिल्डींग, बि/विंग, सातवा माळा, देवरीपाडा, श्रीलंका कौसा मुंब्रा, जि.ठाणे यास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी कारणाने पळवुन नेले म्हणुन अशा तक्रारीवरून मुंब्रा पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्र.1451/2024 भा.द.वि. कलम 363 प्रमाणे दाखल करून तपास सुरू करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक संपत चव्हाण हे करीत असताना गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली की अपहिरत मुलगा नामे मेहताब मन्सुरी याची बॉडी आंबेडकरपाडा, पानेरीपाडा, डोगराचे झाडाझुडपात बांबुचे झाडाचे बाजुला, कुजलेल्या स्थितीत संशयास्पद मिळुन आली. तेथे सहायक पोलीस आयुक्त कोळेकर तसेच मुंब्रा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी तेथे पोहचुन तपास सुरू करून मयत मुलाचे प्रेत पोस्टमार्टम व पुढील तपासकामी छ.शि.म. हॉस्पीटल, कळवा येथे पाठविले.

नमुद मुलगा अल्पवयीन असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, सुभाष बुरसे, पोलीस उपआयुक्त, परि-1 ठाणे शहर, व सपोआ. कोळेकर – कळवा विभाग यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक संजय दवणे, पोलीस निरीक्षक आर.बी.पाचोरकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. संपत चव्हाण, सपोनि. अजय कुंभार व त्यांची टिम असे पथक नेमुन घटनेची गोपनीय माहीती काढण्याबाबत मार्गदर्शन केले.
या मध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचे तपास पथकाने गोपनीय साक्षीदार व बातमीदार तसेच परिसरातील सीसीटिव्ही फुटेचचे विश्लेषण करून कौशल्यपुर्ण तपास करून यातील संशयीत फैज सुलतान मालीम (वय 23 वर्षे), रा.राहत अपार्टमेंट, रूम नं.201, कौसा मार्केट, कौसा, मुंब्रा, ता.जि. ठाणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी करून मानवी कौशल्याचा वापर करून त्याने गुन्ह्याची कबुली दिली कि, अल्पवयीन मयत मुलगा नामे मेहताब बिजलउद्दीन मंन्सुरी (वय 15 वर्षे), यास रेहानबाग, देवरीपाडा, श्रीलंका कौसा मुंब्रा, ठाणे येथुन फिरण्यासाठी आंबेडकरपाडा, कौसा, मुंब्रा येथील डोगरात घेवुन गेला, तेथे संशयीत नामे फैज सुलतान मालीम (वय 23 वर्षे) सोल्युशन याची नशा करित असताना मेहताब यांने पाहिल्यावर त्याने तुझे आई वडील यांना नाव सांगतो असे बोलण्याने त्यास राग येवुन त्याने अल्पवयीन मयत मुलगा नामे मेहताब बिजलउद्दीन मंन्सुरी (वय 15 वर्षे) याला बगलेत दाबुन बेशुद्ध करुन त्यास डोंगरावर नेवुन त्यांचे डोक्यात दगड मारुन जीवे ठार मारल्याचे सांगीतल्याने सदर गुन्ह्यात्त (दि.10जून) रोजी भादवि कलम 302,201 प्रमाणे कलम वाढ करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास पोनि. आर.बी. पाचोरकर यांचेकडे वर्ग करण्यात आला असुन त्यास 11 जून रोजी 16.19 वा.अटक केली आहे. त्याला 15जून पर्यंत रिमांड मध्ये ठेवण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे,सहपोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हान,अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे,विनायक देशमुख, पोलिस उपआयुक्त, परि-1 ठाणे शहर सुभाष बुरसे,सहायक पोलिस आयुक्त, कळवा विभाग उत्तम कोळेकर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोनि. नितीन पगार, पो.नि. आर.बी. पाचोरकर, पोनि. संजय दवणे, सपोनि. अजय कुंभार, सपोनि. संपत चव्हाण, सपोनि गंगावणे, सफौ. जाधव, पो.हवा. महाले, पो.हवा. अजीज तडवी, पो.हवा. खाबडे, पो.शि. कदम, पो.शि. विरकर, पो.हवा. कुरकुटे, पो.ना. पवार, पो.शि. आव्हाड, यांनी केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आर.बी. पाचोरकर हे करित आहेत.


