सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन हुडकेश्वर पोलिसांनी उघड केले ५ घरफोडीचे गुन्हे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हुडकेश्वर पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस ताब्यात घेऊन , ५ गुन्हे उघड करुन, एकुण १७,९०,०००/-रू चा मुद्देमाल केला जप्त….

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार सुरेश शंकरराव सरोदे, वय ६३ वर्षे महात्मा गांधी नगर प्लॉट न. ६५ नागपुर येथे  राहतात त्यांचे मुलाचे लग्न असल्याने ते  दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४.४५ वा चे दरम्यान नैवेदयम सभागृह, कळमणा येथे गेले होते त्यादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन, आंत प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीचे लॉकर तोडुन त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने एकुण किमती १,०३,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला यावरुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४), ३१७ (५), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.





त्याअनुषंगाने हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून तसेच गुप्त बातमीदारा तर्फे मिळालेले माहीती वरून आरोपी रजनीकांत केशव चानोरे वय २४ वर्ष रा. राजेंद्र वार्ड, शुक्रवारी, निळया पाण्याचे टाकीजवळ, भंडारा यास निष्पन्न करुन त्यास  पाळत ठेवुन मध्यप्रदेश, भोपाल येथील इंद्रनगर येथुन त्यास ताब्यात घेवुन अटक केले. आरोपीची पोलिस कोठडी प्राप्त करून दरम्यान आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार व पाहीजे असलेला आरोपी प्रताप गोपाल उरकुडे वय २५ वर्ष रा. राजेंद्र वार्ड, भंडारा याचे सह संगणमत करून वर नमुद घरफोडी केल्याची कबुली दिली.



आरोपीने वरील गुन्हयाव्यतीरिक्त पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीत ईतर ०४ ठिकाणी सुदधा घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीकडुन एकुण ५ गुन्हे उघडकीस आणुन त्याचे ताब्यातुन एकुण १३० ग्रॅम सोन्याच्या ४ लगडी, वरणा कार क्र. डी.एल.१० सी.डी. ७६३७ बजाज पल्सर क. एम.एच.३६ ए.एन. १९९८ व १ अॅपल कंपनीचा मोबाईल असा एकुण १७,९०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहीजे आरोपीचा शोध सुरू आहे.



आरोपी हा घरफोडीचा अट्टल गुन्हेगार असुन तो किरायाने फ्लॅट घेवुन महागडी जिवन शैलीने राहुन परिसरात घरफोड्या करण्याच्या सवयीचा आहे. त्याचेवर छत्तीसगढ येथे ३, चंद्रपुर येथे ३, भंडारा येथे-९ असे अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) शिवाजीराव राठोड, पोलीस उपायुक्त (परीमंडळ ४) रश्मीता राव, सहा पोलीस आयुक्त(अजनी विभाग) विनायक कोते यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. ज्ञानेश्वर भेदोडकर, पोनि गुन्हे नागेश कुमार चातरकर, सपोनि पंकजकुमार चके, स.फौ. शैलेश ठवरे, नंदकिशोर तायडे, पोहवा. गणेश बोंद्रे,नापोशि ओमप्रकाश मते, राजेश मोते, मुकेश कन्नाके, राजेश धोपटे, गौरव गजभिये, व सायबर सेल परि.क्र. ०४ चे पोहवा हिमांशु पाटील यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!