चाकुचा धाक दाखवुन व्यापार्यास लुटणारे काही तासात जरीपटका पोलिसांनी केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चाकुचा धाक दाखवुन व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जरीपटका पोलिसांनी काही तासात केली गजाआड….

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी घनश्याम आयलदास वासवानी वय ५५ वर्षे रा. ब्लॉक नं २२ इंन्द्र कॉलनी पो. ठाणे जरीपटका नागपुर. हे दि ११ जानेवारी रोजी रात्री ९.५० वा चे सुमारास त्यांचे गांधीबाग स्थित दुकान बंद करून जवळील काळया रंगाची बॅग ज्यामध्ये दुकानातील कलेक्शनचे १,५०,०००/- रूपये नगदी आणि दुकानातील काही बिल होते. ती बॅग घेवुन फिर्यादी आपल्या दुचाकी ने आपल्या घरी जात असतांना घराजवळील अॅडव्होकेट बच्छवानीच्या घराजवळ रात्री ०९.५० वा. आले असता फिर्यादीच्या दुचाकीचे समोर एक काळयां रंगाचा जॅकेट घातलेला सडपातळ बांध्याच्या एक इसम ज्यांचे अंदाजे वय २० वर्ष गाडी समोर आल्याने फिर्यादीने गाडी थांबवली.





त्या अज्ञात इसमाने फिर्यादीला त्याचे जवळील बॅग मागीतली तेव्हा फिर्यादीने बॅग देण्यास नकार दिल्याने त्या इसमाने फिर्यादीला हातबुक्कीने मारहान करणे चालु केले. त्यांनतर तेथेच काही अंतरावर त्या इसमाचे तीन साथीदार उभे होते. ते फिर्यादीजवळ आले त्यामधील लाल जॅकेट घातलेला सडपातळ बांधा असलेला एक इसम ज्याचे वय अंदाजे २० ते २२ वर्ष, याने त्याच्या जवळील एक चाकु काढुन फिर्यादीच्या पोटावर उजव्या बाजुला मारून जखमी केले आणि फिर्यादी जवळील पैशाची बॅग हिसकावुन घेवुन अज्ञात चार इसमापैकी दोन इसम हे बॉम्बे स्कुटर कडे तर दोन इसम त्यांच्या अंगात लाल आणि काळया रंगाचा जॅकेट घातलेले आय लव्ह जरीपटका कडे पळु लागले. त्यावेळी फिर्यादी हे जोरजोराने चोरचोर असे ओरडत असतांना त्यांचे मागे धावत होता. त्यावेळी त्यांचाच पाचवा इसम सहजरामानीच्या घराजवळ उभा होता. फिर्यादी हा जोरजोराने ओरडल्याने त्या तीन इसमाजवळ गर्दी जमल्याने तीन इसमामधील एक इसम हा लोकाना चाकु दाखवुन घाबरवत होता. त्यामुळे गर्दी मधील कोणतेही लोक त्यांचे जवळ जाण्यास घाबरत होते. त्यांनतर ते तिन इसम हे तेथुन दुचाकीवर ट्रिपल सिट बसुन पळून गेले. त्याचेच दोन साथीदार दुसऱ्या दुचाकीवर बसुन पळुन गेले. अशा फिर्यादीने दिलेल्या रिपोर्ट वरून अज्ञात आरोपी विरूध्द पो. ठाणे जरीपटका येथे अप क्रं. २५/२०२५ कलम ३११ भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला



गुन्हयाचे तपासादरम्यान तपास पथकातील पोलिस उप-निरीक्षक आशीष मोरखडे, निकेतन किल्लेदार पोलिस स्टाफनी घटनास्थळावरील, परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमरावरून गुन्हयामध्ये आरोपींनी वापरण्यात आलेल्या दुचाकी वाहनाबाबत माहीती काढुन ती गुप्त बातमीदाराना दिली. गुप्त बातमीदाराने तीन इसम हे गुन्हयात वापरात आलेल्या दुचाकी वाहनासारखे दिसणारे वाहन नालंदा चौक शांतीनगर येथील परीसरात तीन इसम हे वापरत असल्याचे सांगीतले. अशा माहीतीवरून दि. १८ जानेवारी रोजी रात्री ८.१५ वाजता स्टाफसह नमुद खबरेच्या ठिकाणी गेले असता काळया रंगाचे हिरो कंपनीची दुचाकी स्पेन्डर प्लस गाडी क. एम.एच.३१ सी.जे.५५११ वर तीन इसम मिळुन आल्यांने त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव १) विक्की नरेंद्र धुवारे वय १८ वर्षे रा. हाउस नंबर ११०९/१६३ एन.आय.टी ग्राउंडजवळ पोलीस ठाणे शांतीनगर नागपुर २) सुजल आनंद पाटील वय २२वर्ष रा. प्लॉट नं ७१३ आंबेडकर चौक नालंदा चौक जवळ पो.ठाणे शांतीनगर नागपुर व विसंबा असे सांगितले त्यांना सखोल विचारपुस केली असता त्यांनी नमुद गुन्हा हा पाहीजे आरोपी नामे १) रिषभ अग्रवाल वय अदाजे २५ वर्षे २) यश गोंडाने वय २४ वर्ष रा. एन.आय.टी ग्राउडजवळ पो. ठाणे शांतीनगर नागपुर. याचेसह मिळुन केल्याचे कबुल केल्याने आरोपी नामे १) विक्की नरेंद्र धुवारे वय १८ वर्षे २) सुजल आनंद पाटील वय २२ वर्ष यांना दि. १८ रोजी अटक करून त्यांना मा. न्यायालयात हजर करून दि. २२ पावेतो पोलिस कोठडी रिमांड घेण्यात आला.



यातील विधीसंघर्षग्रस्त बालक यांस ताब्यात घेवुन त्यास बालगृहात ठेवण्यात आले आहे. गुन्हयामध्ये वापरण्यात आलेली टु-व्हिलर स्पेन्डर प्लस गाडी क्र. एम.एच.३१ सी.जे.५५११ ही आरोपीकडुन जप्त करण्यात आली आहे. गुन्हयाचे तपासात आरोपी रिषभ अग्रवाल वय अदाजे २५ वर्षे व यश गोंडाने वय २४ वर्ष .एन.आय.टी ग्राउडजवळ पो.ठाणे शांतीनगर नागपुर यांचा शोध घेवुन ते उज्जैन मध्यप्रदेश राज्य येथे मिळुन आल्यांने त्यांना ताब्यात घेवुन नागपुर येथे आणुन पुढील कारवाई करण्यात येईल

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त(उत्तर विभाग)प्रमोद शेवाळे)पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ निकेतन कदम, सहा. पोलिस आयुक्त ( कामठी विभाग) विशाल क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली जरीपटका पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरूण क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि आशीष मोरखेडे, निकेतन किल्लेदार, पो.हवा मनिष कोकर्डे, अमित सातपुते,सचिन तायडे, नापोशि तरंग शर्मा, पोशि  विकास पाठक, सागर यादव,मंगेश डोनाडकर,अमोल हरणे,राहुल चव्हाण,नितेश नागपुरे,विकास पाठक,अनुज ठाकुर, पवन कामारकर,गंगाधर दंडे यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!