
अंमली पदार्थ विरोधी पथकाने MD ड्रग विक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या,२५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त..,
नागपुर शहर गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात विक्रीकरीता आलेले MD Drug सह ४ पेडलर यांना घेतले ताब्यात…
नागपुर(शहर प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी गुन्हे शाखा तसेच सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना सक्त सुचना वजा आदेश दिलेत की अंमली पदार्थ विरोधात नागपुर पोलिसांचे धोरण हे स्पष्ट आहे झिरो टॅालरन्स त्याअनुषंगाने गुन्हे शाखेच्या अधिनस्त असलेले एन.डी.पी.एस. पथक, गुन्हे शाखा येथील अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून,अजनी पोलिस स्टेशन हद्दीत सापळा छापा कार्यवाही करून आरोपी नामे



१) आतिश लक्ष्मण बागडे, वय २८ वर्षे, रा. अजनी रेल्वे क्वॉर्टर नंबर आर. बी. १ / ३२६, ब्लॉक नं. AB, पो. ठाणे अजनी, नागपूर शहर

२) गौरव उर्फ सागर शेषराव कटारे, वय २५ वर्ष, रा.टिमकी तीनखंबा चौक, हनुमान मंदीर जवळ, पो.ठा. तहसील नागपूर शहर

यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यातून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१) २४१ ग्रॅम ५ मिली ग्रॅम मेफेड्रोन सदृश्य ड्रग पावडर, किं.अं. २४,१५,००० /- रू.
२) एक सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा A-31 मॉडलचा हॅन्डसेट मोबाईल किं. १०,०००/ रु.
३) गुलाबी रंगाची बॅग किं. अं. ३००/ रु.
४) बजाज पल्सर गाडी क्र. एम. एच. ४९ – बी.डी. ५३४६ किं.अं. ८०,०००/ रु.
५) बिना नंबरची अॅक्टीवा गाडी किं. ८०,००० /- रू.
६) एक नोकीया कंपनीचा कीपॅड मोबाईल किं. १०००/- रू.
७) एक लोखंडी कुकरी किं. अं. ५००/- रू.
असा एकूण २५,८६,८०० /- रू चा मुददेमाल
सदरची कारवाई पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त गुन्हे संजय पाटील,पोलिस उपायुक्त, डिटेक्शन निमित गोयल,सहा.पोलिस आयुक्त,डिटेक्शन अभिजित पाटील
मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपूर शहर; मा. पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शनात अंमली पदार्थ विरोंधी पथकाच्या मपोनि ललीता तोडासे,सपोनि मनोज घुरडे, पोहवा शैलेश डोबोले विजय यादव, विवेक अढाऊ मनोज नेवारे,पोशि रोहीत काळे सहदेव चिखले शेषराव रेवतकर,सुभाष गजभिये , मपोहवा अनुप यादव चालक पोहवा नितीन साळुंके व्हिडीओग्राफर प्रविण ठाकुर, डॉग युनिटचे पोहवा सुखदेव धुर्वे,नापोशि अमोल पडधाम यांनी केली आहे. आरोपींविरूद्ध पो. ठाणे अजनी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



