
गिट्टीखदान पोलिसांनी सराईत दुचाकी चोरट्यास घेतले ताब्यात,उघड केले ५ गुन्हे…
सराईत वाहन चोरट्यास गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात,०५ गुन्हे उघडकीस, २,९५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २०/१/२४ चे ४.०० वा. ते ५.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, मानवता नगर, येथे राहणारे फिर्यादी मनिष अरूण भोयर, वय ३३ वर्षे, यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस क्र. एम. एच ३१ ई.एल ८६०६, किंमती २०,००० /- रू. ची घरासमोर पार्क करून, लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात
चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलिस ठाणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पोलिस ठाणे गिट्टीखदान चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून तसेच, पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या माहितीवरून, सापळा रचुन आरोपी


रितीक लेखीराम लांजेवार, वय २१ वर्षे रा. चंद्रमणी चौक, कंट्रोल वाडी, अमरावती रोड, नागपुर

यास नमुद वाहनासह ताब्यात घेवून त्यांची सखोल विचारपूस केली
असता, त्यांने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी केलेले वाहन जप्त करण्यात
आले. आरोपीची अजुन सखोल विचारपुस केली असता, त्यांने पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीतुन

सुझुकी जिक्सर गाडी क्र एम. एच. ३१ एफ. एम १६६६ किं.१०००००/-
डियो मोपेड गाडी क्र. एम. एच ३१ एफ.डी ७७२७ किं २०,०००/- रू
चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पोलिसठाणे अंबाझरी हद्दीतुन, रॉयल ईन्फील्ड गाडी क्र. एम.एच. ३१ एफ.ई ९७०८ कि १,२५,०००/- रू.
ची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पोलिस ठाणे प्रतापनगर
हद्दीतुन,
होन्डा सिबीआर गाडी क. एम. एच. ३७ यू ८४३६ किंमती ३०,०००/-₹ ची चोरी केल्याची कबुली दिली.
याप्रमाणे आरोपीचे ताब्यातुन नमुद वाहने जप्त करण्यात आले आहे.
गिट्टीखदान पोलिस ठाणे चे अधिकारी व अंमलदार यांनी गिट्टीखदान येथील ३ अंबाझरीतुन १ प्रतापनगर हद्दीतुन १ वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेवुन, त्याचेकडुन वाहन चोरीचे ०५ गुन्हे उघडकीस आणुन एकुण किंमती २,९५,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
वरील कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,राहुल मदने पोलिस उपायुक्त परीमंडळ २ यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि महेश सागळे, पोउपनि गोपाल राउत, पोहवा बलजीत ठाकुर, अजय यादव, अशोक रामटेके, ईशांक आटे, पोअ. आकाश लोथे सचिन खडसे,नितेश वाकडे, नागनाथ कोकरे यांनी केली आहे.


