निवडनुकीच्या अनुषंगाने सिताबर्डी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केली रोकड जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

विधानसभा निवडणुक २०२४ आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने नाकाबंदी दरम्यान पोलिस ठाणे. सिताबर्डी येथील पथकाने  ७,९३,५००/रू रक्कम अवैधरित्या घेवून जाणा-या इसमास घेतले ताब्यात….

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने दिनांक २३/१०/२०२४ रोजी पोलिस ठाणे सिताबर्डी, नागपूर शहर हद्दीत वरिष्ठांचे आदेशाने अवैधरित्या निवडणुक संबंधाने काळा पैसा वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अनुषंगाने नाकाबंदी केली असता महाराजबाग चौकातुन विदयापीठ लायब्ररी चौकाकडे जात असतांना एक इसम रोडचे पलीकडचे बाजुस नाल्याचे पुलाचे समोर दुचाकी वर संशयास्पद स्थितीत मिळुण आला





सदर इसमाजवळ जावुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव उमेश रामसिंग ऐदबान वय ५० वर्ष व्यवसाय – अमृत तुल्य दुकान चालक रा. प्लॉट नं. १६९, मानेवाडा वेणु कॉर्नर,  अजनी नागपूर असे सांगितले. त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे जवळील पॅशन प्रो लाल रंगाची मोटारसायकल  क्र एमएच ३१ डीजे ०५९१ चे डिक्कीमध्ये एका पिशवीत ५०० रूपयांचा १५५९ नोटा व २०० रूपयांचा ७० नोटा असे नोटांचे बंडल एकुण रक्कम नगदी ७,९३,५००/-रु त्याचे ताब्यात मिळुन आले सदर रकमेबाबत योग्य उत्तर न मिळाल्याने पॅशन प्रो लाल रंगाची मो. सा क्रमांक एमएच ३१ डीजे ०५९१ कि.अं. १५,०००/-रु असा एकुण ०८,०८,५००/-रु ताब्यात पंचासमक्ष जप्त करण्यात आला



सदरील कार्यवाही बाबत निवडणुक निर्णय अधिकारी, ५६ पश्चिम विधानसभा मतदार संघ, नागपूर शहर यांना यांना पुढील कार्यवाही करीता माहिती देण्यात आली. व जप्त करण्यात आलेली रक्कम पो. ठाणे सिताबर्डी येथे जमा करण्यात आली



सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंगल, सह. पोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त(उत्तर प्रभाग) राहुल शेवाळे,पोलिस उप आयुक्त(परीमंडळ २)  राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस आयुक्त(सिताबर्डी विभाग). सुधीर नंदनवार, वपोनि चंद्रशेखर चकाटे, सपोनि चंद्रकांत ममताबादे, पोहवा. अमित त्रिपाठी, पो.शि. कपील राऊत,सचिन भोयर यांनी  केली

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!