
ट्रॅव्हल्समधुन तंबाखुजन्य पदार्थाची तस्करी करणार्यास युनीट ५ ने केले जेरबंद,३.२५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
महाराष्ट्रात प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्यावर गुन्हेशाखा युनिट ५ ची धडक कार्यवाही…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंगल यांचे संकल्पनेतील नशेखोरी विरोधात नागपुर शहर पोलिसांना ॲापरेशन थंडर जोरात राबवताय तरीसुध्दा काही समाजकंटक चोरुन लपुन तंबाखु जन्य पदार्थाची चोरुन लपुन तस्करी करतांय यावर प्रतिबंध म्हनुन वरीष्ठांचे आदेशाने गुन्हे शाखेचे सर्व पथके दिवस रात्र अशा तस्करांवर नजर ठेऊन आहेत


त्याअनुषंगाने दि १८. जुन २०२५ रोजी रात्रीचे ०१.२० ते २.४० वा. चे दरम्यान गुन्हेशाखा युनिट ५ चे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत, पेट्रोलींग करीत असतांना,त्यांना गोपनीय माहीती मिळाली ट्रॅव्हल्स मधुन तंबाखुजन्य पदार्थाची वाहतुक होणार आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून वाठोडा बायपास रोड, तरोडी पुलाजवळ हायटेक टायर दुकानासमोर, ट्रॅव्हल्स वाहन क. सि.जी ०४ एन.यू ५१२१ ला थांबवुन पंचासमक्ष पाहणी केली असता, चालक आरोपी धनराज धनीराम शाहु, वय ४१ वर्ष, रा. वार्ड नंग. ५०, न्यू पुर्रना, महावीर नगर, जि. रायपूर, छत्तीसगढ, याचे ताब्यात डी. एस. एस टोबॅको नावाचे सुगंधीत तंबाखूचे पाऊच असलेले १३ नग मोठे नायलॉनचे पाढऱ्या रंगाचे पोते प्रति पोते २५,०००/- रू. असा एकुण ३,२५,०००/-रू. चा मुद्देमाल मिळुन आला.

सदर आरोपीस मालाचे बिल व पावती बाबत विचारले असता त्याने कोणतेही कागदपत्रे सादर केले नाही. आरोपी चालक हा स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता शासनाने प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ व गुटखा बेकायदेशीर अवैधरित्या विक्री करीता वाहतुक करतांना/बाळगतांना पोलिसांना मिळुन आला. यावरुन आरोपी विरूध्द पोलिस ठाणे वाठोडा येथे कलम २२३, २७४, २७५, १२३ भा.न्या.सं. सहकलम ५९ अन्न सुरक्षा मानके अधिनीयम २००६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस अटक करून मुद्देमालासह पुढील कारवाई कामी वाठोडा पोलिसांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), अभिजीत पाटील,) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनीट ५ चे पोलिस निरीक्षक संदीप बुआ, पोहवा. राजेन्द्र टाकळीकर, रूपेश नानवटकर, राजुसिंग राठोड, अनिस खान, नापोअं. प्रविण भगत, पोअं. विशाल नागभिडे, दिपक बावनकर, रोशन तांदुळकर, सुनिकुमार यादव, आशिष पवार, योगेश महाजन व देवचंद थोटे यांनी केली.


