दिघोरी चौकातील घरफोडीचा गुन्हा हुडकेश्वर पोलिसांनी केला उघड,मुद्देमालासह दोन आरोपींना गाजियाबाद येथुन घेतले ताब्यात…
अट्टल घरफोड्या तसेच मोबाईल शॅापी फोडण्यात तरबेज असलेला मुस्तकीन यास गाजीयबाद येथुन ताब्यात घेऊन हुडकेश्वर पोलीसांनी उघड केला दिघोरी येथील मोबाईल शॅापी घरफोडीचा गुन्हा,दोन आरोपींसह २४ लाखाचेवर मुद्देमाल केला जप्त…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील सचिन दामोदर गावंडे वय ४० वर्ष यांनी पोलिस स्टेशन हुडकेश्वर येथे तक्रार दिली की ते दिघोरी, सर्वश्री नगर, प्लॉट नं. ५७, उमरेड रोड, नागपूर येथे राहत असुन त्यांचे दिघोरी चौक येथे श्री संतकृपा प्रोव्हीजन्स नावाचे मोबाईल शॉपी आहे. दिनांक १३. ०९.२०२४ चे रात्री १०.०० वा. दुकान बंद करुन गेले व दि. १४.०९.२०२४ ला सकाळी दुकान उघडण्याकरीता आले असता त्यांना दुकानाचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसले कुणीतरी अनोळखी चोरट्यांनी फिर्यादीचे मोबाईल शॉपीचे शटर उचकावुन, आत प्रवेश करून शॉपी मध्ये ठेवलेले वेगवेगळया कंपनीचे ८९ मोबाईल फोन, तिन वॉच, ईअर बर्डस व ईतर साहित्य किंमती अंदाजे २४,३२,५७१/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी सचिन दामोदर गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हयाचे तपासात हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तसेच १०० पेक्षा अधिक CCTV कॅमेराचे बारकाईने निरीक्षण व तांत्रीक तपास करून व मिळालेले खात्रीशीर माहितीवरून सदरच्या घरफोडीत रेकॅार्डवरील उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथील काही ईसमांना निष्पन्न करुन तेथे पथक रवाना करुन गाजियाबाद उत्तर प्रदेश येथे जावुन सापळा रचुन यातील आरोपी क्र १) मोहम्मद मुस्तकीन उर्फ सलमान वल्द मोहम्मद मुस्सलीन वय २६ वर्ष रा. डासना, जि. गाजियाबाद उत्तर प्रदेश यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने सदर गुन्हा आरोपी क्र २) मोहम्मद शहजाद मोहम्मद फारूख वय ४२ वर्ष रा. शहजाद कॉलोनी, मेरठ, जि. मेरठ, उत्तर प्रदेश व पाहिजे असलेला आरोपी क्र ३) ईकबाल नावाचा ईसम यांचे सोबत मिळुन केल्याचे सांगीतले त्यांची अधिक सखोल चौकशी केली असता यातील आरोपी क्र १ मोहम्मद मुस्तकीन उर्फ सलमान वल्द मोहम्मद मुस्सलीन हा अट्टल घरफोड्या असुन तो खासकरुन मोबाईल शॅापी फोडण्यात पटाईत आहे त्याचेवर बेळगाव कर्नाटक तसेच अकोला जिल्ह्यात मोबाईल शॅापीत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत
सदरचे आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी गेलेले ७२ मोबाईल फोन किंमती अंदाजे १७,१८,५४३/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी क्र १ व २ यांना अटक करण्यात आली आहे व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास करीत आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंगल,अपर पोलिस आयुक्त(दक्षिण विभाग) संजय पाटील,पोलिस उपायुक्त(परीमंडळ ४) रश्मीता राव, सहा पोलिस आयुक्त(अजनी विभाग) विनायक कोते यांचे मार्गदर्शनाखाली, वरीष्ठ पोलिस निरीक्षक. ज्ञानेश्वर भेदोडकर, पोलिस निरीक्षक(गुन्हे). नागेशकुमार चातरकर,सपोनि पंकजकुमार चके, सफौ. शैलेश ठवरे, नंदकिशोर तायडे, पोहवा. गणेश बोंन्द्रे नापोशि. राजेश मोते, मुकेश कन्नाके, पोशि राजेश भोपटे, ओमप्रकाश मते, गौरव गजभिये, मंगेश मडावी, हिमांशू पाटील व कुणाल उके यांनी केली.