सीबीआय अधिकारी बनुन केली ॲमॅझान कंपनीच्या अधिकाऱ्याची केली फसवनुक,मुख्य आरोपीस गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सीबीआय अधिकारी असल्याची बतावनी करुन ॲमॅझॅान कंपनीच्या अधिकार्याची आर्थिक फसवनुक करणारा मुख्य आरोपीस नागपुर गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…..

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे बजाजनगर हद्दीत, लक्ष्मीनगर, वेस्ट हायकोर्ट रोड, नागपुर येथे राहणारे फिर्यादी आशय अविनाश पल्लीवार, वय २४ वर्षे हे ॲमेझॉन कंपनीत वरिष्ठ पदावर नोकरी करतात.दि(२१)एप्रिल२०२४ ते दि(१९)एप्रिल.२०२४ दरम्यान, फिर्यादी आशय यांचे मोबाईल फोनवर एका अनोळखी इसमाने कॉल करून “तुमची सि.बी.आय कडे चौकशी सुरू आहे. नमुद चौकशी मध्ये तुम्ही भारतातुन विदेशात महिलांचे अवयव पाठविल्याचे तसेच विदेशात रक्कम
पाठविल्याचे निष्पन्न झाल्याने चौकशी सुरू आहे, तसेच फिर्यादी यांना स्काईप अॅपचा कॅमेरा सतत सुरू ठेवण्यास सांगुन फिर्यादीस २४ तासापर्यत डिजीटल अरेस्ट केले व सि.बी.आय कडे सुरू असलेल्या चौकशी दरम्यान बॅक खात्यातील संपुर्ण रक्कम, घरातील संपुर्ण सोन्या-चांदीचे दागिने तसेच फिर्यादीचे आई-वडीलांकडे असलेली सोन्या-चांदीचे दागिने व बँकेतील रोख रक्कम देखील सि.बी. आय कडे सुपूर्द करावी लागेल” असे बोलून फिर्यादीस भिती दाखवुन, फिर्यादीचा विश्वास संपादन केला.





त्यानंतर यातील आरोपी १) सुमेरसिंह जगमलसिंह वय ४५ वर्ष रा. खिरजा जोधपूर,राजस्थान २) प्रकाश मेघनानी रा. जवाहर पार्क, जयपूर, राजस्थान ३) दलपतसिंह धसिंह वय २२ वर्ष रा. धोकलसर,
पोस्ट सेखाला, जोधपूर, राजस्थान यांनी संगणमत करून नागपूर येथे येवुन हॉटेल कन्हैया तसेच हॉटेल रेणुका इंन नागपूर येथे येवुन सि.बी.आय अधिकारी असल्याचे सांगुन बनावट कागदपत्रे खरे असल्याचे भासवुन फिर्यादीचा विश्वास संपादन केला व फिर्यादी यांचे कडुन सोन्याचे दागिने १८०० ग्रॅम, १ किलो चांदी व रोख ६७ लाख रूपये तसेच बँकेद्वारे ५७ लाख २९ हजार ८५२ रूपये असा एकुण २,३२,९९,५८२ /- रू चा मुद्देमाल फिर्यादी कडुन घेवुन
फिर्यादी ची आर्थिक फसवणुक केली. यावरुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे सायबर येथे सदर नमुद आरोपींविरूध्द कलम ३८४, ४१९, ४२०, ४६५, ४७०, ४७१, ५०६, १७०, १२०(ब) भा.दं.वि. सहकलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क्र. २ चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास तथा
कागदोपत्री पुरव्याचे आधारे तपास करून आरोपी १) सुमेरसिंह जगमलसिंह वय ४५ वर्ष रा. खिरजा जोधपूर, राजस्थान
यास निष्पन्न करून मुंबई येथुन ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा त्यांचे साथिदार व पाहिजे असलेला
आरोपी क्र. २) प्रकाश मेघनानी रा. जवाहर पार्क, जयपूर, राजस्थान ३) दलपतसिंह धसिंह वय २२ वर्ष रा. धोकलसर, पोस्ट सेखाला, जोधपूर, राजस्थान यांचे सोबत संगणमत करून केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपींचे एकुण २४ बॅंक खाते फ्रिज करण्यात आलेले असुन आरोपी क्र. १ सुमेरसिंग यास अटक करण्यात आलेली आहे. पाहिजे आरोपींचा शोध सुरू असुन पुढील तपास सुरू आहे.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)संजय पाटील, पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ च्या वरीष्ठ मपोनि. शुभांगी देशमुख, सपोनि. गजानन चांभारे, पोहवा. संदीप चंगोले, दिनेश डवरे, शैलेष जांभुळकर, गजानन कुबडे, नापोशि सुरेश तेलेवार, कमलेश गणेर, सुनिल कुंवर पोअं. संदीप पांडे यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!