सहा संशयीतांना ताब्यात घेऊन धंतोली पोलिसांनी उघडलकेला जबरी चोरीचा गुन्हा…
जबरी चोरी करणाऱ्या ६ आरोपींना धंतोली पोलीसांनी केली अटक, सात लाख रूपयाचा मुद्देमाल केला हस्तगत…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी किशोर समाधान भांदर्गे, वय ३७ वर्षे, रा. धोत्रा, भंडगोजी, ता. चिखली, जि. बुलडाणा यांना त्यांचे परीचयाचे शुभम साखळीकर, रा. चिखली, बुलडाणा यांनी नागपुर, वर्धमान नगर येथील गोपी जोशी यांचे कार्यालयात जावुन ते देतील ती रक्कम घेवुन येण्यास सांगीतले होते. फिर्यादी हे त्यांचे मित्र अमोल काकडे यांचेसह नागपुरला आले व गोपी जोशी यांचे कार्यालयातुन ११,९०,०००/- रू. रोख घेतले. व परत बुलडाणा येथे जाण्याकरीता दिनांक २६.०८.२०२४ चे संध्या ०७.०० वा. चे सुमारास ओला कॅबने पोलिस ठाणे धंतोली हद्दीतील बाबा ट्रॅव्हल्सचे समोरील रोडवर, वर्धा रोड, नागपुर येथे पोहचले.
तेव्हा अचानक एका पल्सर बाईकवर आलेल्या दोन अनोळखी ईसमांनी फिर्यादी किशोर यास गाडीची काच उघडण्यास सांगीतली. फिर्यादीने काच उघडला असता, आरोपींनी फिर्यादीस चाकुचा धाक दाखवुन ठार मारण्याची धमकी देवुन पैशाची बॅग हिसकावली व बाईक ने पळुन गेले. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलिस ठाणे धंतोली येथे कलम ३०९ (४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्ह्याचे तपासात धंतोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देवुन, सखोल तांत्रीक तपास करून आरोपी १) तनुज चंद्रकांत झाडे, वय ३० वर्षे, रा. प्लॉट नं. १०३, नरेंद्र नगर, अजनी, नागपुर २) निखील राजु श्रीवास, वय २१ वर्षे, रा. खरबी टि-पॉईंट, वाठोडा, नागपुर ३) अभीषेक लोकेंद्र विश्वकर्मा, वय २१ वर्षे, रा. छापरू नगर, लकडगंज, नागपुर ४) गौरेश जितेंद्र भुते, वय २० वर्षे, रा. श्रीकृष्ण नगर, नंदनवन, नागपुर ५) हार्दीक राजु ठोसर, वय २१ वर्षे, रा. गरोबा मैदान, लकडगंज, नागपुर ६) आशिष अमरेश पांडे, वय २१ वर्षे, रा. राजेंद्र नगर, नंदनवन झोपडपट्टी, नागपुर ७) सौरभ देवानंद सहारे, वय २२ वर्षे, रा. प्लॉट नं. १३५, जुना बगडगंज, नागपुर यांना निष्पन्न करुन ताब्यात घेतले.
आरोपींचे ताब्यातुन पल्सर २२० वाहन क. एम.एच. ४९ टि. ३१७० व पल्सर एन.एस. १५० क. एम.एच. ४९ सि. ई. ६९५० तसेच, रोख ६,००,०००/- रू. असा एकुण ७,००,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना अटक करून त्यांची दिनांक ३१.०८.२०२४ पर्यंत पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आली आहे. पाहीजे आरोपी क. १) कैलास पुसदकर, रा. गरोबा मैदान २) दुर्गेश इंगोले, रा. बगडगंज, नागपुर यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलिस आयुक्त (उत्तर प्रभाग)प्रमोद शेवाळे,पोलिस उप आयुक्त (परी. २)राहुल मदने, सहा. पोलिस आयुक्त (सिताबर्डी विभाग) सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. विनायक कोळी, सपोनि संकेत चौधरी, पोउपनि घनाजी मारकवाड, पोहवा. सुभाष वासाडे, प्रशांत इंगोले, नापोशि. अमोल लोणकर, पोशि मनोज सोनावने, माणिक दहीफळे, विनोद चव्हान, भुवनेश्वर मोहड, चेतन भोळे, ऋषभ निशीथकर, तसेच, पोलीस ठाणे सदर येथील पोशि विक्रम ठाकुर यांनी केली.