कलमणा पोलिसांनी दोन संशयितांनी ताब्यात उघड केला घरफोडीचा गुन्हा…
कलमना पोलिसांनी तांत्रीक तपासाच्या आधारे चोरटे निष्पन्न करुन उघड केला घरफोडीचा गुन्हा….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(१९)रोजी मुकेश माऊजीभाई शाह वय ४२ वर्ष रा. प्लॉट नं. १७, हिवरी ले-आउट, प्रशांत शाळे समोर, नागपूर यांनी पोलिस स्टेशन कळमणा येथे तक्रार दिली की त्यांचे प्लॉट नं. १२०, इस्टंडन इंड्रस्टीज एरीया, भरत नगर, कळमणा येथे अमर पुटींग नावाने तुअर दाल मिल आहे. दि( १८)रोजी ८.३० वा ते आपली दाल मिल बंद करून घरी गेले असता दि.(१८)चे मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने दाल मिलचे शटरचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून मिल मधील एकुण ७०० किलो तुअर दाल किंमती १,१९,००० /- रू ची पोत्यामध्ये भरून चोरून नेली.अशा फिर्यादी यांचे तक्रारीवरुन पोलिस ठाणे कळमणा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५७,
३८०, ३४ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पोलिस ठाणे कळमणा चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सदरचा गुन्हा हा १) भागवत उर्फ गुड्डू मून्ना राय वय ३२ वर्ष रा. प्लॉट नं. २५६, घरसंसार ले–आउट, पारडी, नागपूर २) दामु रामलखन खेलवार वय २९ वर्ष ३) रामलखन रामसखा खेलवार वय
४५ वर्ष दोन्ही रा. प्लॉट नं. ७६, पुनापूर, भवानी मंदीर रोड, पारडी यांनी केल्याचे निष्पन्न झाले त्यावरुन यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, आरोपींनी वर नमुद घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली असुन
आरोपींचे ताब्यातुन ३६५ किलो तुअर दाल किंमती अंदाजे ६२,०५०/- रू व अशोक लेलॅण्ड टुप्लस क्र. एम. एच ४९ बि.झेंड ०११६ असा एकुण ७,६२,०५०/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त उत्तर विभाग प्रमोद शेवाळे,पोलिस उप आयुक्त (परि क. ५ )निकेतन कदम,सहायक पोलिस आयुक्त (कामठी विभाग) विशाल क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन कळमना गोकूल महाजन, सपोनि. उज्वल इंगोले, पोउपनि रामलोड, सफौ. मुटकूरे, पोहवा. अंकलवार, भैसारे, पोशि अमृते, देसाई व डांगले यांनी केली.