गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १३८ ग्रॅम MD केले जप्त..
एम.डी पावडर बाळगणाऱ्या दोघांना गुन्हेशाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेऊन,१३८ ग्रॅम एम डी पावडर केले हस्तगत….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(१२)रोजीसंध्या ७.२५ ते रात्री ९.४५ वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत, हिमांशु ले-आऊट, सार्वजनिक रोडवर, नागपूर येथे अॅक्टीव्हा मोपेडवरील एक ईसम एम. डी. पावडर खरेदी-विक्री करीता येणार आहे.
अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन पंचासमक्ष दोन संशयीत ईसमांना थांबवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यानी त्यांचे नावे आरोपी क्र. ०१) सागर हिवदास चौधरी, वय २७ वर्षे, रा. प्लॉट नं. ४१/८२,विनोबा भावे नगर, पारडी, नागपुर २) रितीक गजानन कळंबे, वय २३ वर्षे, रा. आंबेडकर चौक, जगजिवनराम नगर, गरोबा मैदान, लकडगंज, नागपुर असे सांगीतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचे जवळ १३८ ग्रॅम एम. डी.पावडर किंमती १३,८०,०००/- रू. ची मिळुन आली. तसेच त्यांचे ताब्यातुन एम डी पावडर, दोन मोबाईल फोन, दोन
अॅक्टीव्हा मोपेड व रोख १०,००० /- रू. असा एकुण १५,१०,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींचे कृत्य हे कलम ८(क), २२(क) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपींविरूध्द पोलिस ठाणे वाठोडा येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असुन अटक आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव वाठोडा पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंघल,सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली,गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, सपोनि. मनोज घुरडे, सफौ. सिध्दार्थ पाटील, पोहवा.
विवेक अढाऊ, मनोज नेवारे, सुरज भानावत, नापोअं. पवन गजभिये, राशिद शेख, पोअं. रोहीत काळे, सहदेव चिखले,सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर व मपोअं. आरती चव्हाण यांनी केली.