
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेऊन त्याचेकडुन जप्त केले २२ ग्रॅम एम. डी. पावडर….
एम. डी. पावडर बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक,गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल यांचे आदेशाने नागपुर शहरात अंमली पदार्थ विरोधात कडक कार्यवाही करण्याचे आदेश गुन्हे शाखेला देण्यात आले आहे त्याअनुषंगाने दि.(८) रोजी चे ०६.१० वा. ते ०८.२० वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी
पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलिस ठाणे ईमामवाडा हद्दीत, टि.बी. क्वॉर्टर परीसर, दुर्गा माता मंदीर समोर, सार्वजनिक रोडवर एका मोपेड वरील दोन इसमांवर संशय आल्याने त्यांना थांबवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यानी त्यांचे नावे १) जितु नंदु गोराडे, वय ३४ वर्षे,रा. बाराखोली, धम्मकुटी विहार जवळ, जरीपटका, नागपुर २) यश बबलु तोमस्कर, वय २१ वर्षे, रा. टि.बि. वार्ड क्वॉर्टर नं. १३/१२ स्कीन ओ.पि.डी. जवळ, ईमामवाडा, नागपुर असे सांगीतले. त्यांच्या हालचाली संशयीत वाटल्याने त्यांची अंगझडती घेतली असता,त्यांचे जवळ २२.९ ग्रॅम एम. डी. पावडर किंमती २,२९,००० /- रू. ची मिळुन आली तसेच त्यांचे ताब्यातुन एम. डी पावडर, दोन मोबाईल फोन, एक मोपेड वाहन असा एकुण २,९९,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


त्यांची अधिक विचारपुस केली असता, ते कार्तीक तोमस्कर, वय २४ वर्षे, रा. टि.बि. वार्ड क्वॉर्टर, ईमामवाडा, नागपुर याचे मदतीने अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करीत असल्याचे सांगीतले. आरोपींचे हे कृत्य कलम ८(क), २२(ब) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने दोन्ही आरोपींविरुध्द पोलिस ठाणे ईमामवाडा येथे गुन्हा नोंदविण्यात आला असुन. ०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई कामी ईमामवाडा पोलिसांचे ताब्यात देण्यात आले.तसेच यातील मुख्य आरोपी कार्तीक तोमस्कर, वय २४ वर्षे, रा. टि.बि. वार्ड क्वॉर्टर, ईमामवाडा, नागपुर याचा शोध सुरु आहे

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंघल,सह पोलिस आयुक्त,अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे,) संजय पाटील, पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोनि. गजानन गुल्हाने, सपोनि. मनोज घुरडे, सफौ. सिध्दार्थ पाटील, पोहवा. राहुल पाटील,
मनोज नेवारे, पोशि रोहीत काळे, सुभाष गजभिये यांनी केली.



