
पाचपावली पोलिसांनी उघड केला बाबुपेठ येथील घरफोडीचा गुन्हा…
पाचपावली पोलिसांनी रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन उघड केला बाळाभाऊ पेठ येथील स्वस्थ धान्य दुकान घरफोडीचा गुन्हा….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१५) चे ७.३० वा. ते दि. (१६) चे ११.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत बाळाभाऊपेठ, बब्बू मेंबरचे घरा जवळील, मनोज ग्राहक सहकारी संस्था नावाचे, स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानातील २० क्विंटल तांदुळाची पोती, १० क्विंटल गव्हाची पोती व सि. सी. टी. व्ही कॅमेरा डिव्हीआरसह असा एकुण ८५,५००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला.
अशी तक्रार फिर्यादी श्रीमती शुभांगी सतिश वांधे वय ३९ वर्ष रा. फ्रेडस कॉलोनी चौक, गिट्टीखदान, नागपूर यांनी पोलिस ठाणे
पाचपावली येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५७, ३८०, ४११ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पोलिस ठाणे पाचपावली चे पथकास मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून, सदरची चोरी ही रेकॅार्डवरील गुन्हेगार यांनी केल्याचे निष्पन्न झाले यावरुन आरोपी १) विधांशू उर्फ ददू रूपेश उर्फ बबलू रोकडे वय १९ वर्ष २) आदित्य उर्फ तन्मय संदीप लोखंडे वय १९ वर्ष दोन्ही रा. बाळाभाऊपेठ, ज्ञानदिप बुध्द विहार जवळ, पाचपावली, नागपूर यांना सापळा रचुन ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, आरोपींनी वर नमुद घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन ३० पोते तांदुळ, सायकल ट्रॉली, सि. सी. टी. व्ही कॅमेरा, मेमोरीकार्ड असा एकुण ५२,६५० /- रू चा मुद्देमाल जप्त
करण्यात आला आहे. आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त (परि क्र. ३)गोरख भामरे, सहायक पोलिस आयुक्त (लकडगंज विभाग)श्वेता खाडे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि.बाबुराव राऊत, पोहवा. ज्ञानेश्वर भोगे, नापोअं. ईमरान शेख, रोमेश मेनेवार, राहुल चिकटे पोशि गगन यादव, संतोष शेंन्द्रे व महेन्द्र सेलोकर यांनी केली.




