स्पा च्या नावाखाली चालणारा देहविक्रीचा सदर पोलिसांनी केला पर्दाफाश…
स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा सदर पोलिसांनी केला पर्दाफाश…
नागपूर (शहर प्रतिनिधी) – सलुन स्पा मध्ये एक महिला हि स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता सलुन स्पा चे आडुन मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करुन स्पा सलुन सेंटर मध्येच जागा उपलब्ध करुन देऊन त्यांचे कडुन देहव्यापार करून घेणाऱ्या आरोपींच्या सदर पोलिसांनी मुसक्या आवळल्या व वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या मध्ये पोलिसांनी 1) साक्षी उर्फ मनिषा चंद्राहास तुपे (वय 30 वर्षे) रा.उर्दीला कॉलनी हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंटजवळ, वर्धा रोड, नागपुर 2) राकेश साबुलाल बंदेवार उर्फ राज ठाकुर (वय 33 वर्षे), उज्वल नगर, सोमलवाडा, पो.ठाणे सोनेगाव, नागपुर, 3) अभिषेक प्रभाकर माहुरे, 4) मोहन भगवंतराव सुरकर, (वय 32 वर्षे), रा.प्लॉट नं.89 मनिष नगर, नागपुर, 5) राजेद्र चिंतामणराव पांडे, (वय 40 वर्षे), रा.निलडोह, हिंगणा, पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. (वय 52 वर्षे), हिंगणा, वानाडोंगरी, डी.मार्ट समोर, पोलीस ठाणे हिंगणा आदींवर कारवाई केली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पोलिस स्टेशन सदर हद्दिमधील द लुक लक्झरी सलुन स्पा,छावणी छिंदवाडा रोड नागपूर सदर येथील सलुन स्पा ची चालक महीला स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता सलुन स्पा चे आडुन मुलींना पैशांचे आमिष देवून देहव्यापारास प्रवृत्त करुन स्पा, सलुन मध्येच जागा उपलब्ध करुन देवून त्यांचे कडुन देहव्यापार करवुन घेत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी पोलीसांनी सापळा रचुन बोगस ग्राहकाला द लुक लक्झरी सलुन स्पा मध्ये पाठविले. बोगस ग्राहकाकडुन इशारा प्राप्त होताच पोलिस स्टेशन सदर चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मनिष ठाकरे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमप्रकाष सोनटक्के, सी.आय.यु. पथक परिमंडळ .2 नागपूर शहर, पोहवा. महेश बावणे, पोहवा. नंदकिशोर देवगडे, पोहवा. जयंता, पोशि. आकीब शेख, मपोशि राधा, नीलीमा तसेच पोलिस ठाणे सदर येथील नापोशी आशिष, पोहवा. प्रमोद तसेच उपलब्ध पंच (सामाजिक कार्यकर्ते) असे नमुद ठिकाणी छापा कार्यवाही केली असता आरोपी 1) साक्षी उर्फ मनिषा चंद्राहास तुपे (वय 30 वर्ष) रा.उर्दीला कॉलगी हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंटजवळ, वर्धा रोड, नागपुर 2) राकेश साबुलाल बंदेवार उर्फ राज ठाकुर (वय 33 वर्षे), रा.101 उज्वल नगर, सोमलवाडा, पो.ठाणे सोनेगाव, नागपुर 3) अभिषेक प्रभाकर माहुरे, (वय 32 वर्षे), रा.प्लॉट नं.89, मनिष नगर, नागपुर हे चार पिडीत महिलांना अडकवुन ठेवून तसेच पैशाचे प्रलोभन दाखवुन त्यांना जागा उपलब्ध करून देवुन देहव्यापार करण्यास प्रवृत्त करतांना मिळुन आले. यातील चार महिलांची सुटका करण्यात आली. तसेच घटनास्थळावरून एकुण 28,140/- रूपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला.
आरोपी – 1) मोहन भगवंतराव सुरकर, (वय 40 वर्षे), रा.निलडोह, हिंगणा पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. 2) राजेद्र चितांमनराव पांडे, (वय 52 वर्षे), हिंगणा, वानाडोंगरी, डी. मार्ट समोर, पोलीस ठाणे हिंगणा हे ग्राहक म्हणुन समागमाकरीता महिला मिळविण्याकरीता द लुक्स लक्झरी सलुन स्पा येथे मिळुन आल्याने आरोपींचे सदरचे कृत्यु गुन्हा होत असल्याने नोंद करून तपास सुरु करण्यात आला.
अशा प्रकारे सदरची कारवाई हि पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(उत्तर प्रभाग)प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त परीमंडळ २ राहुल मदने,सहा पोलिस आयुक्त सदर विभाग माधुरी बाविस्कर,पोलिस स्टेशन सदरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मनिष ठाकरे सपोनि ओ.एस. सोनटक्के, पोहवा. महेश बावणे, नंदकिशोर देवगडे, जयंता, पोशि आकीब शेख, मपोशि राधा, नीलीमा तसेच पोलिस ठाणे सदर येथील अंमलदार नापोशी आशिष, पोहवा. प्रमोद यांनी मिळून केली आहे.