गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने उघड केले मोटार
वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना ताब्यात घेऊन उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे,गुन्हेशाखेच्या सामाजीक सुरक्षा विभागाची कामगिरी….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि (३०) एप्रिल चे रात्री ११.०० वा. चे दरम्यान, फिर्यादी हितेश
राजेन्द्र वानखेडे वय २१ वर्ष रा. प्लॉट नं. १, अहील्या नगर, जयताळा रोड, नागपूर यांनी त्यांची मोपेड अॅक्टीव्हा क्र एम.एच ३१ ई.डब्लू ०८४६ किंमती एकुण ४०,००० /- रू ची ही पोलिस ठाणे एम. आय. डी. सी हद्दीत वानखेडे ज्वेलर्स समोर, जयताळा, नागपूर येथे लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे एम.आय.डी.सी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा
दाखल करण्यात आला होता.
याचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत असतांना गुन्हेशाखेच्या सामाजीक सुरक्षा विभागाचे पथकास मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून,सदरची मोटारसायकल चोरी ही रेकॅार्डवरील गुन्हेगार प्रज्वल संजय पाटील, वय २५ वर्षे रा. दव्हा, ता. उमरेड, जि. नागपूर व त्याचा.सहकारी शुभम बापू चौधरी वय २७ वर्ष रा. पांढराबोडी, संजय नगर, अंबाझरी, नागपूर व त्यांचे दोन साथिदार विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे साथिदार पाहिजे आरोपी १) सर्वेश उर्फ टिटू चंद्रशेखर परिहार रा. संजय नगर, पांढराबोडी, नागपूर यांचे सोबत संगणमत करून वर नमुद गुन्हयातील वाहन चोरीची कबुली दिली.
आरोपींची अधिक चौकशी केली असता, त्यांनी पोलिस ठाणे एम. आय. डी. सी हद्दीतुन पुन्हा एक मैटालीक ग्रे रंगाची अॅक्टीव्हा क्र. एम.एच ४० बी.एम २०९२ किंमती ७०,००० /- रू चोरी केल्याची तसेच पोलिस ठाणे कोतवाली हद्दीतुन काळया रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्र. एम. एच ४९ ए.झेंड २८१३ किंमती ७०,००० /- रू ची असे एकुण ०३ वाहन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी केलेले वाहने एकुण किंमती १,८०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी एम.आय.डी.सी पोलिसांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) संजय पाटील पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन),निमीत गोयल,सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा)डॅा अभिजित पाटील,यांचे मार्गदर्शखाली,सामाजिक सुरक्षा शाखेच्या प्रमुख मपोनि. कविता ईसारकर, पोहवा. सचिन बडीये, नापोशि. शेषराव राउत, पोशि कुणाल मसराम, अश्विन मांगे, समीर शेख, नितीन वासने, मपोअं. पुनम शेंडे व आरती यांनी केली.