
एटीएम मधे छेडछाड करुन चोरी करणारा युनीट ४ च्या ताब्यात…
एटीएम मधे छेडछाड चोरी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट ४ ने घेतले ताब्यात…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (०१)जुन रोजी ०९.०० वा. ते १०.०० वा. चे दरम्यान, फिर्यादी स्वप्नील मारोतराव गभने वय ३५ वर्ष रा. नेहरू नगर, सक्करदरा, नागपूर हे बॅक ऑफ इंडीयाचे एटीएम, कडबी चौक, नागपूर येथे गेले असता त्यांना एटीएम मशीन आय डी क्रमांक एसएनजी ९०९० मशीनचे माउथ शटर ॲसेब्ली मध्ये छेडछाड केल्या सारखे दिसून आले. नमूद एटीएम मधून १००० /- रू काढले असल्याचे फिर्यादीचे निदर्शनास आले.


तसेच दिनांक २८.०५.२०२४ व दिनांक ३०.०५.२०२४ रोजी सुध्दा याच एटीएम मशीनमधून अशाच प्रकारे छेडछाड झाल्याचे फिर्यादीस दिसून आले होते. एटीएम मशीन मधून अज्ञात आरोपीने दिनांक ०१.०६.२०२४ रोजी छेडछाड करून १००० /- रू चोरी करून नेले असल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलिस ठाणे जरीपटका नागपूर येथे कलम ३८० भा. दं.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हेशाखा, युनिट ०४, नागपूर येथील पथकाने नमुद गुन्हयाचे अनुषंगाने समांतर तपास करीत असता गुप्त बातमीदारामार्फत मिळाली की, मयुर कायरकर नावाचे इसमाने नागपूर शहरामध्ये बरेच एटीएम मशीनमधुन पैसे चोरीचे गुन्हे केले असून सध्या तो अश्याच प्रकारचे चोरीचे प्रयत्नात त्याचे बुलेट गाडी क्रमांक एम.एच ४९ सि.ई ७०७२ ने तो मानेवाडा परीसरात फिरत आहे.

अशा खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस विचारणा केली असता आरोपीने वर नमुद गुन्हयाची कबुली दिली. अधिक विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, तो अॅल्युमिनअम धातुचे पट्टीचा वापर करून, एटीएम मशिन चे आतमध्ये जेथून पैसे बाहेर येतात त्या ठिकाणी फसवितो व एटीएम चे बाहेर उभा राहतो. एटीएम मधून पैसे काढणे करीता आलेला व्यक्ती एटीएम मशीनमध्ये पासवर्ड टाकूण एटीएम मधून पैसे बाहेर येण्याची प्रतिक्षा करतो परंतू एटीएम मध्ये अॅल्युमिनीअम ची प्लेट फसविले असल्याने ते पैसे ॲल्युमिनीअमचे पट्टीला अडकून असतात व बाहेर येत नाही. एटीएम मशीन मधून पैसे बाहेर न आल्याने पैसे काढणेकरीता आलेले व्यक्ती एटीएम मधून निघून जातो. तो व्यक्ती निघून गेल्यानंतर नमूद आरोपी एटीएम चे आत जातो व एटीएम मध्ये फसवूण ठेवलेली ॲल्युमिनीअम ची प्लेट बाहेर काढून त्या प्लेटमुळे एटीएम मशीन मधून बाहेर न आलेले पैसे काढून त्या पैश्याची चोरी करतो.
आरोपीने वरील गुन्हा केल्याचे तसेच नागपूर शहरात जरीपटका हद्दीत -२, पाचपावली हद्दीत – ३, तसेच पोलिस ठाणे नंदनवन हद्दीत –३ ठिकाणी असलेले एटीएम मशीन मधून याच पध्दतिने पैसे चोरी केल्याचे तसेच पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगीतले.
आरोपीने एटीएम मशिन मधून एकुण अंदाजे ३६,००० /- रूपयांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीचे ताब्यातुन गुन्हा करतेवेळी वापरलेले वाहन रॉयल इंफील्ड कंपनीची बुलेट गाडी क्रमांक एम.एच ४९ सिई ७०७२, एक मोबाईल फोन व गुन्हयातील तसेच ईतर एटीएम मशीन मधून चोरी केलेले नगदी पैकी १०,५८० रू रोख असा एकूण २,३०,५८०/–रू चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंग,सहपोलिस आयुक्त अश्वती दोर्जे, अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल,सहा पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) डॉ. अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट ४ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रमेश ताले, पोउपनि अविनाश जायभाये, पोहवा. सुनिल ठवकर, अतुल चाटे, आशिष क्षिरसागर, नापोशि चेतन पाटील, देवेन्द्र नवघरे, स्वप्नील अमृतकर, पोअं. संदीप मावलकर, श्रीकांत मारवाडे व लिलाधर भेंडारकर यांनी केली.


