
गुन्हे शाखा युनीट २ ने क्रिकेट बुकीस छापा टाकुन घेतले ताब्यात…
आय.पी.एल. क्रिकेट मॅचवर सट्टा खायवळी करणारा आरोपीस गुन्हेशाखा युनिट क्र. २ ने छापा टाकुन घेतले ताब्यात….
नागपुर(शहर प्रतिनिधी )- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्या भारतात आयपीएल क्रिकेटचे सामने भारतभर सुरु आहे,सर्व क्रिकेटप्रेमी याचा आनंद घेतात तर काही जण त्यावर जुगार खेळतात किंवा खेळवितात अशाच क्रिकेट बुकीवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी सर्व प्रभारी तथा गुन्हे शाखेला दिले आहेत


त्याअनुषंगाने दि.( १०) चे ८.५० वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट २ चे पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे मानकापुर हद्दीत कार्तिक नगर, बोधड ले-आउट, नागपूर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा जुगार सुरू आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सदर माहीतीची शहानीशा करुन घटनास्थळी छापा कारवाई केली असता, तेथे आरोपी १) फरहान अली लियाकत अली, वय २८ वर्ष रा. गांधीबाग,गवळीपूरा, नागपूर २) शोहेब अली शाकीब अली सैय्यद वय ३८ वर्ष रा. १७५, समाज भुषन सोसायटी, जाफर नगर,नागपूर ३) ईमरान अली जाहीर अली वय ४२ वर्ष रा. सतरंजीपूरा, बडी मस्जिद जवळ, भंडारा रोड, नागपूर ४)ईरशाद रफीक कुरेशी वय ३६ वर्ष रा. दिघोरी नाका, मोतीलाल नगर, नागपूर हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता संगणमत करून आय. पी. एल लाईव्ह क्रिकेट मॅच चेन्नई सुपर किंग्स विरूध्द गुजरात टाईटन्स वर मोबाईलवरून संभाषण करून क्रिकेट सट्टयाची ऑनलाईन खायवळी करतांना प्रत्यक्ष मिळुन आले. आरोपींचे ताब्यातुन मल्टीमीडीया मोबाईल व लाईनचे एकुण २१ नग मोबाईल फोन, दोन टॅब, दोन लॅपटॉप, इंव्हटर बॅटरी, लाईन बॉक्स व तिन दुचाकी वाहने असा एकुण ५,७१,७०० /- रू. चा मुद्देमाल मिळाल्याने जप्त करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेवुन,
त्यांचेविरूध्द पोलिस ठाणे मानकापूर येथे कलम ४, ५ महा. जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये कारवाई करून आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करीता मानकापूर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर डॅा रविन्द्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) निमीत गोयल, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा) डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ च्या वरीष्ठ मपोनि. शुभांगी देशमुख, सपोनि. गजानन चांभारे, पोहवा. राजेश तिवारी, महेन्द्र सडमाके, शैलेष जांभुळकर, दिपक चोले, नापोशि अर्जुन यादव, दिनेश डवरे, संदीप चंगोले, कमलेश गणेर व पोअं. विवेक श्रीपाद यांनी केली.



