
नागपुर शहर गुन्हे शाखा युनीट ३ ने उघड केले घरफोडीचे ३ गुन्हे…
गुन्हेशाखा युनिट क्र. ३ पोलीसांची कामगिरी :- • घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, एकुण ३ गुन्हे उघडकीस.
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(३०)एप्रिल ते मे (११)दरम्यान पोलिस ठाणे पारडी हद्दीतील प्लॉट नं. १७८, डी/५, भवानी नगर, पारडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सुरेश शंकरराव कटाईन वय ६८ वर्ष हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन १० दिवसासाठी चंद्रपूर येथे गेले असता कोणीतरी अज्ञाताने घराचे मुख्य दाराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करून आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १,०५,०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला.


सुरेश शंकरराव कटाईन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे पारडी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट. ३ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून गुन्हयातील आरोपी १) आदीत्य उर्फ गब्बर विकास बब्बर वय २३ वर्ष रा.नागार्जुन कॉलोनी, जरीपटका, नागपूर यास त्याचे ईतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालकासह ताब्यात घेतले. आरोपीला विचारपूस केली असता, आरोपीने नमुद घडफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच दि(१४) एप्रिल रात्री ८ ते १५ एप्रिल रात्री ९.०० वा. चे दरम्यान प्लॉट नं. ३०, शिवम नगर, पारडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी रितीक झुलेलाल पटले वय २२ वर्ष यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन सोन्या-चांदीचे दागिने व रोख १०,०००/- रू असा एकुण ३७,५०० /- रू चा मुद्देमाल चोरून नेणारे आरोपी मोहम्मद जाकीर मोहम्मद
शाहीद वय २२ वर्ष रा. सिंधीबन, मोठा ताजबाग, नागपूर यास व त्याचे एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेवुन सखोल विचारपूस केली असता, त्यांनी नमुद घरफोडी केल्याची कबुली दिली.
अशाच प्रकारे पोलिस ठाणे नंदनवन हद्दीत मिरे ले–आउट, प्लॉट नं. ३८, न्यू गिनी वर्ल्ड नावाचे ऑटो मोबाईल दुकानात घरफोडी करणारे आरोपी क्र. १) शेख सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूख वय २० वर्ष २) सोहेल कसाई ईकबाल कुरेशी वय १९ वर्ष दोन्ही रा. आझाद
कॉलोनी, मोठा ताजबाग, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचा साथिदार व पाहिजे असलेला आरोपी
क्र. ३) सोहेल भांजा रा. मोठा ताजबाग, नागपूर याचे सोबत संगणमत करून वरील ऑटोमोबाईल दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. नमुद तिन्ही घरफोडीचे गुन्हयातील आरोपींना अटक करण्यात आलेली असुन आरोपींचे ताब्यातुन सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी वाहन व रोख रक्कम असा एकुण ३,७८,६६० /- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी पारडी व नंदनवन पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील
पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा)डॅा अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट ३ प्रभारी पोलिस निरीक्षक. मुकूंद ठाकरे, पोउपनि मधुकर काठोके, सफौ. दशरथ मिश्रा, सतिश पांडे, पोहवा. संतोषसिंग ठाकुर, विजय श्रीवास, पोशि जितेश रेड्डी, दिपक लाकडे, दिपक दासरवार, विशाल रोकडे व प्रमोद देशभ्रतार यांनी केली.



