
पोलिस असल्याची बतावणी करुन १० लाखाची रोकड असणारी बॅग पळवणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पोलिस असल्याची बतावणी करून पैशाची बॅग पळविणाऱ्या दोन आरोपींना केले जेरबंद,गुन्हेशाखा, युनिट ३ व वाहन चोरी पथकाची संयुक्तिक कामगिरी….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यातील तक्रारदार अनुराग अरूण पांडे, वय २५ वर्षे, रा. हारडी, तिवारीया, तह. नैगाही, जि. रिवा (म.प्र.) ह.मु. – सोनी फ्रेंन्ड्स प्रायव्हेट लिमीटेड फॅक्टरी चे रूममध्ये, काटोल रोड, कळमेश्वर, जि. नागपूर हे सोनी फ्रेंन्ड्स प्रायव्हेट लिमीटेड येथे सेल्समेन चे काम करतात दि(१३) रोजी संध्या ५.०० वा चे सुमारास ते त्यांचे कंपनीचे १०,००,०००/-रू. एका बॅगमध्ये घेवुन पोलिस ठाणे लकडगंज हद्दीत जमुना अपार्टमेंट, आंबेडकर चौक येथे गेले असता, त्यांनी त्यांची दुचाकी गाडी पार्कीगमध्ये उभी करून पायऱ्यांनी जात असतांना, एक अनोळखी ईसम वय अंदाजे ३० वर्षे याने फिर्यादीस मागुन पकडले व बनावटी आयकार्ड दाखवुन पोलिस असल्याचे सांगीतले व “तुम्हारे बॅगमें गांजा है क्या?” असे म्हटले असता, तक्रारदार यांनी बॅगमें दस लाख रूपये है। असे सांगीतले. यावरुन सदर ईसमाने तक्रारदार यांना “आपको पोलिस ठाणे चलना पडेगा” असे म्हटले व त्यांना पैशाचे बॅगसह बाहेर घेवुन आले असता, बाहेर सदर अनोळखी ईसमाचा एक साथीदार वय अंदाजे ३५ वर्षे हा त्याचे युनिकॉर्न दुचाकी क्र. एम. एच. ४० सि. जि. ३२६२ वर बसुन होता.या दोन्ही अनोळखी ईसमांनी संगणमत करून तक्रारदार यांना त्यांचे १० लाख रूपयांच्या बॅगसह जुना भंडारा रोड, हरीहर मंदीर जवळ घेवुन गेले व तेथे गाडी थांबवुन त्यांना “बॅग चेक करना है” असे म्हणुन त्यांना त्याठिकाणी सोडुन दोन्ही अनोळखी ईसम हे तक्रारदार यांचे जवळची रूपयांची बॅग घेवुन वाहनासह पळुन गेले. याप्रकरणी यातील तक्रारदार अनुराग अरूण पांडे,यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे लकडगंज येथे कलम ४२०, १७१, ३७९, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदरील गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हेशाखा करीत असतांना युनिट ३ तथा वाहन चोरी तपास पथक यांना मिळालेल्या गोपनीय
खात्रीशीर माहीतीवरून व तांत्रीक तपास करून, कळमेश्वर जि. नागपुर येथुन आरोपी क. १) मंगेश नारायण डेहनकर,वय ३१ वर्षे, रा. लोणारा, हनुमान मंदीर जवळ, कळमेश्वर, जि. नागपुर २) सागर अशोक पाटील, वय ३४ वर्षे, रा. भुयारी शिरपुर हनुमान मंदीर जवळ, कळमेश्वर, जि. नागपुर यांना निष्पन्न करुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी मिळुन वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन ९,५०,००० /- रूपये रोखसह बॅग, गुन्हयात वापरलेली दुचाकी क्र. एम.एच. ४० सि.जी. ३२६२ किंमती अंदाजे १,००,०००/- रू. आणि हेल्मेट असा एकुण १०,५०,५००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पोलिस ठाणे लकडगंज यांचे ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

वरील कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (गुन्हे)निमीत गोयल,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा)अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनीट ३ चे वपोनि. मुकुंद ठाकरे, पोउपनि मधुकर काठोके, सफौ. दशरथ मिश्रा, ईश्वर खोरडे,पोहवा. संतोषेसिंग ठाकुर, नापोशि. अनिल बोटरे, पोशि दिपक लाखडे, जितेश रेड्डी, दिपक दासरवार, विशाल रोकडे,प्रमोद देशभ्रतार तसेच, वाहनचोरी विरोधी पथकाचे पोउपनि अनिल इंगोले व पथक तसेच, सायबर युनिट चे पोउपनि झिंगरे व पथक यांनी केली.



