कुख्यात गुंड व दारुतस्कर पंजुमल चेलानी MPDA कायद्यान्वये येरवडा काराग्रुहात स्थानबध्द…
नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक २९ / १२ / २०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे जरीपटका, तहसील, कपीलनगर नागपूर शहर व रामनगर, भद्रावती जिल्हा चंद्रपुर चे हद्दीत कुख्यात दारू तस्कर नामे अशोक वल्द पंजुमल चेलानी, वय ४३ वर्षे, रा. साई चंदुराम मठाजवळ, जरीपटका, पोलिस ठाणे जरीपटका,
नागपुर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८९ अंतर्गत दिनांक २९/१२/२०२३ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. २९/१२/२०२३ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
कुख्यात दारू तस्कर अशोक वल्द पंजुमल चेलानी याचेविरूध्द पोलिस ठाणे जरीपटका, तहसील, कपीलनगर नागपूर शहर तसेच, चंद्रपुर जिल्हयातील पोलिस ठाणे रामनगर, भद्रावती येथे गैरकायदयाच्या जमावाचा सदस्य असणे, आपखुषीने दुखापत करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, आपराधीक जीवे ठार मारण्याची धमकी देणे, गृह-अतिक्रमण करणे, बेकायदेशीररित्या दारू बाळगणे, बेकायदेशीररित्या दारूची आयात व निर्यात करणे, गुन्हा
करण्यासाठी कट रचणे, इत्यादी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबध्द इसम हा मध्यप्रदेश, दिल्ली, हरीयाणा व इतर राज्यात स्वस्त दरात मिळणाऱ्या विदेशी दारूची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या आणुन जास्त दरात विक्री करीत होता. अशाप्रकारचे गुन्हे याअगोदर चंद्रपुर जिल्हयातील पोलिस ठाणे रामनगर व भद्रावती येथे केल्याबाबत गुन्हे दाखल आहेत. तसेच अलीकडील काळात गुन्हेशाखेकडून पोलिस ठाणे कपील नगर हददीत बेकायदेशीररित्या इतर राज्यातील विदेशी दारूचा साठा किंमती रू.
४१,६४,०१० / – जप्त करण्यात आला होता. सदर तपासाचे दरम्यान अशोक चेलानी हा अवैधरित्या विदेशी दारूची तस्करी करण्याची टोळी तयार करून अवैधरित्या विदेशी दारूची विक्री करून स्वतःचे आर्थिक फायदा करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. अशा अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्यास प्रतिबंध करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
अशाप्रकारे अवैधरित्या दारू तस्करी करणारा व्यक्ती नामे अशोक वल्द पंजुमल चेलानी याचा बेकायदेशीररित्या दारू विक्रीचा, आयात व निर्यातीचा अवैध व्यवसाय निरंतर वाढत असल्याने अशा प्रकारच्या अवैध दारूच्या तस्करांवर आळा बसणे आवश्यक असल्याने पोलिस निरिक्षक, युनिट क. ५, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम. पी. डी.ए. विभागाने
नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलिस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता, त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.