हरीयाणा येथील माजी सैनीकच निघाला अनेक घरफोडीचा सुत्रधार…
गुन्हेशाखा, वाहन चोरी विरोधी व सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने घरफोडीचे ०७ गुन्हे केले उघड…,
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(०८) मे रोजी दुपारचे चे सुमारास, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, प्रेरणा नगर, मारोती अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२ येथे राहणारे फिर्यादी . दिपक रंजीत सरकार, वय ४७ वर्षे हे त्यांचे फ्लॅट
ला कुलुप लावुन ड्युटीकरीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे घराचे दाराचे लॉक तोडुन आत प्रवेश करून सोन्याचे दागिने व नगदी असा एकुण ७,०१,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.यावरुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी व सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी नमुद
गुन्ह्याचा समातर तपास करीत असतांना, व्यवसायीक कौशल्य वापरून व गोपनीय माहीतीवरुन सदर गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचे निष्पण्ण झाले यावरुन गुन्हे शाखेची एक टीम आरोपीचे शोधकामी राजस्थान येथे जावुन संशयीत महीला मिनु देविसेन,रा. हरमाळा, जयपुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, आरोपी १) सतपाल उर्फ फौजी ओमपाल सिंह, वय ४४ वर्षे, रा. सेक्टर ७, मानेसर, गुरूग्राम (हरीयाणा) २) विकास पवण शर्मा, वय ३५ वर्षे, रा. झुणझुण राजस्थान यांनी नमुद गुन्हा व ईतर ६ गुन्हे केल्याचे सांगीतले. तसेच, यातील आरोपी क्र. १) सतपाल उर्फ फौजी हा ८ वर्षे भारतीय सेनेमध्ये होता. त्याने भारतीय सेनेमधील नौकरी सोडल्यानंतर संपुर्ण भारतात त्याचेवर १०० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींना एका गुन्हयात अजमेर पोलिसांनी अटक केली असुन, त्यांचेकडुन
नागपुर शहरातील पोलिस ठाणे १) गिट्टीखदान, नागपुर शहर २) सोनेगाव नागपुर शहर, ३) लातुर शहर ४) संभाजीनगर शहर ५) तोफखाना, अहमदनगर ६) बिदर राज्य कर्नाटक, ७) कलकत्ता, प. बंगाल या ठिकाणी घरफोडी केल्याचे निष्पण्ण झाले आहे. आरोपींना प्रोडक्शन वारंटवर घेवुन पुढील कारवाई करणेबाबत संबंधीत पो. ठाणे ला माहीती देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,सह पोलिस आयुक्त,अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा)डॅा अभिजित पाटील, गुन्हे शाखा दरोडा पथकाचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शखाली,सपोनि. मयुर चौरसिया, पोहवा. राजेश देशमुख, रवि अहीर, प्रशांत गभणे, श्रीकांत उईके, नापोअं. प्रविण रोडे, पोअं.
निलेश श्रीपात्रे, सुधीर पवार, आशिष वानखेडे, तसेच, सायबर टिमचे पोउपनि विवेक झिंगरे तसेच पोशि पराग ढोक, शेखर राघोर्ते, अनंता क्षिरसागर व धिरज पंचभावे यांनी केली.