
IPL सट्टयावर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाचा छापा,३आरोपींसह ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त….
आय.पी.एल. क्रिकेट मॅचवर सट्टा खायवळी करणारे तिन आरोपींना गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने घेतले ताब्यात….
नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (२५) रोजी रात्रीचे ९.३० वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे सोनेगाव हद्दीत प्लॉट नं. १२८, पर्ण अपार्टमेंट, फ्लॅट नं. ३०१, पन्नासे ले-आउट, स्वावलंबी नगर, सोनेगाव, नागपूर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू आहे


अशा मिळालेल्या माहीतीची शहानीशा करुन व याची माहीती वरिष्ठांना देऊन या खात्रीशीर माहितीवरून, नमुद घनास्थळी गेले असता, तेथे १) अयफाज शेख कदीर, वय २३ वर्षे, रा. ज्योतीबा फुले वार्ड, पांढरकवडा, जि. यवतमाळ, २) हरीओम उमेश बत्रा, वय ३१ वर्षे, रा. मु.पो.- करंजी, ता. केळापूर, जि.यवतमाळ ३) रवि नंदकिशोर बोरेले, वय ३८ वर्ष, रा. गोपालकृष्ण वार्ड, पांढरकवडा, जि. यवतमाळ हे तिघे स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता संगणमत करून आय. पी. एल वरील चालु असलेली आर.सी.बी (रॉयल
चॅलेन्जर्स बॅगलोर) विरूध्द एस. आर. एच (सन राईजर्स हैदराबाद) या लाईव्ह क्रिकेट मॅचवर मोबाईलवरून संभाषण करून क्रिकेट सट्टयाची ऑनलाईन खायवळी करतांना प्रत्यक्ष मिळुन आले.

आरोपींचे ताब्यातुन एक एलसिडी टिव्ही, सेट टॉप बॉक्स, दोन रिमोर्ट, एक सोनी कंपनीचे रेकॉर्डर, एक लॅपटॉप, २३ मोबाईल फोन,
एक होल्ड पेटी, दोन हयुंदाई क्रेटा चार चाकी वाहने व एक दुचाकी वाहन असा एकुण ३५,६१,२०० /- रू. चा मुद्देमाल मिळाल्याने जप्त करण्यात आला. अशावरुन सर्व आरोपींनी ताब्यात घेवुन त्यांचेविरूध्द पोलिस ठाणे सोनेगाव येथे कलम ४, ५ महा. जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. आरोपींना मुद्देमालासह सोनेगाव पोलिसांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोर्जे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) निमीत गोयल,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा) डॅा अभिजित पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली, घरफोडी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक. किरण कबाडी, सपोनि. मयुर चौरसिया, पोहवा. राजेश देशमुख, रवि अहिर, प्रशांत गभने, श्रीकांत उईके, मपोहवा. अनुप यादव, नापोअं. प्रविण रोडे, पोअं. आशिष
वानखेडे व अभय यांनी केली.


