
अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्याच्या युनीट २ ने आवळल्या मुसक्या…
प्रतिबंधित सुगंधीत गुटखा तंबाखु विक्रीकरीता बाळगणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात,एकुण १,७७,५६७ /- रू. चा मुद्देमाल केला जप्त…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक १४/०३/२०२४ रोजी संध्याकाळी ७.०५ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट २ पोलिसांचे पथक हे पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना खबर मिळाली की फैजान शेख वल्द शेख अमान हा आपले पानटपरीवर महाराष्ट्रात प्रतिबंधित असा सुगंधीत तंबाखु गुटखा याचा साठा बाळगुन आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून आय.बी.एम रोड, मस्जिद
जवळील, ताज पान शॉप, येथे आरोपी नामे फैजान शेख वल्द शेख अमान रिजवान नासीर खान यांचे घरी किरायाने, गिट्टीखदान, नागपूर याचे पान टपरीवर छापा कारवाई केली. असता तेथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधीत तंबाखुचा साठा किंमती अंदाजे १,८१५/- रू. चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीस नमुद मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस केली असता, त्याने नमुद मुद्देमाल हा मध्य प्रदेश येथुन विक्री करीता आणल्याचे सांगीतले.त्यावरुन आरोपीचे राहते घराची कायदेशीररित्या झडती घेतली असता, त्याचे घरून वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखुचा साठा किंमती अंदाजे १,७७,५६७ /- रू. चा मुद्देमाल मिळुन आला.
आरोपीचे ताब्यातुन एकुण १,७९,३८२/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द ३२८, २७२, २७३, १८८ भा.द.वि., सहकलम ५९ अन्न व सुरक्षा मानके अन्वये गुन्हा नोंदवुन, आरोपीस अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.


सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रविंन्द्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त गुन्हे संजय पाटील ,पोलिस उपायुक्त डीटेक्शन निमित गोयल,सहा.पोलिस आयुक्त(गुन्हे शाखा) अभिजित पाटील ,मपोनिरीक्षक गुन्हे शाखा युनीट २ शुभांगी देशमुख, सपोनि. गजानन चांभारे, पोहवा. नरेश तुमडाम, हंसराज ठाकुर, नापोशि. प्रविण शेळके, गजानन कुबडे, कमलेश गनेर, महेन्द्र सडमाके, पोशि सुनिल कुवर यांनी केली.



