
घरफोडी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट ३ ने घातल्या बेड्या….
घरफोडी करणाऱ्या आरोपीस गुन्हेशाखा युनिट ३ ने केले जेरबंद….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक ०६.०३.२०२४ चे ०९.३० वा. ते ५.०० वा. दरम्यान, पोलिस ठाणे कोराडी हद्दीत, साक्षी प्रतिक्षा अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, प्रेम नगर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी आशा रायभान गजभिये, वय ४२ वर्षे, ह्या ईरा हॉस्पीटल लकडगंज, नागपूर येथे नोकरीवर असुन त्या आपले घराला कुलुप लावुन हॉस्पीटलला डयुटीवर गेल्या
असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून, घरातील बेडरूम मधील लाकडी आलमारीतुन सोन्याचे दागिने व रोख ६५,००० /- रू असा एकुण अंदाजे १,६१,००० /- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे कोराडी येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४५४, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहिती
व तांत्रिक तपास करून, आरोपी रोशन सेवकदास मेश्राम, वय ४१ वर्षे, रा. भिमटेकडी, आयबीएम रोड, गिट्टीखदान, नागपूर यास निष्पन्न करुन ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्याने वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील सोन्याचे दागिने, रोख ८,००० /- रू व गुन्हयात वापरलेले वाहन सिटी १०० मोटरसायकल असा एकुण किंमती अंदाजे २,२७,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई करीता कोराडी पोलिसांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे संजय पाटील,पोलिस उपायुक्त(डिटेक्शन),निमित गोयल,सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे, पोउपनि मधुकर काठोके, सफौ. सतिश पांडे, दशरथ मिश्रा, पोहवा. विजय श्रीवास, संतोषसिंगठाकुर,पोशि जितेश रेड्डी, दिपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार व दिपक लाकडे यांनी केली.




