स्पा मसाज पार्लर च्या नावाखाली देहविक्री करणार्या स्पा सेंटरवर सामाजिक सुरक्षा शाखेचा छापा…
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने स्पा मसाज च्या नावाखाली देहव्यापार करणार्या गंगा स्पा सेंटर वर छापा टाकुन ४ पीडीतांची केली सुटका…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 04 जानेवारी 2025 रोजी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक कवीता ईसरकर यांना गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे. सोनेगाव, नागपूर शहर हद्दीत मध्ये गंगा स्पा, नितीन बिछायत केन्द्राचावर, पहिला माळा सोमलवाडा चौक, वर्धा रोड, येथे गंगा स्पा सेंटर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली अवैध देहविक्रीचा धंदा सुरु आहे
अशा गोपनीय माहीतीवरुन दुपारी 3:00 पोलिस पथकासह सदर पंटर पाठवुन खात्नी झाल्यावर संध्या चे सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी कारवाई दरम्यान नविन भगवान सिंह, – वय 37 वर्षे व त्याची पत्नी वंदना उर्फ श्रृती नवीन सिंह, वय 28 वर्ष दोघेही रा. प्लॉट नं. 99, घर क्र. 1057, अमर नगर, जगताप लेआऊट, निलडोह, पोलिस ठाणे. एम.आय.डी.सी. नागपूर शहर हे दोघेही स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना/महिलांना पैशाचे आमिष देवुन बॉडी मसाज पार्लर चे नावाखाली देहव्यापारास प्रवृत्त करुन त्यांना जागा उपलब्ध करुन देवुन देहव्यापार करवुन घेतात
सदर छापा कार्यवाहीत 04 पिडीत महीला / मुलीची सुटका करण्यात आली. यातील आरोपींनी त्यांना अधिक पैशाचे आमीष दाखवुन मसाज चे नावाखाली देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले. यातील पुरूष आरोपीला ताब्यात घेतले व त्याचे कडुन एकुण 58,090/- रू. चा मुद्देमा जप्त केला असुन आरोपीं विरुध्द पोलीस ठाणे सोनेगाव, नागपूर शहर येथे कलम 143, 3 (5) भारतीय न्याय संहीता सहकलम 4, 5, 7, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त डॅा रविन्द्र सिंगल, सह पोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे), संजय पाटील, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), अर्चित चांडक, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), अभिजीत पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक कविता इसारकर, पोहवा सचीन बढिये, प्रकाश माथनकर, लक्ष्मण चौरे, नापोशि अजय पौनीकर, पोशि नितीन वासने, मपोहवा लता गवई, सरकारी वाहन चालक पोशि कमलेश क्षिरसागर यांनी केली