
पोलिस उपायुक्त परी. ५ चे पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा…
पोलिस उपायुक्त, परि. क्र. ५ निकेतन कदम यांचे विशेष पथकाचा अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर छापा,एकुण ७६,४५० /- रू. चा मुद्देमाल जप्त…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण व लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांचे आदेशाने पोलिस उपायुक्त परी.५ निकेतन कदम यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथक पोलिस ठाणे कपीलनगर हद्दीत दिनांक २२.०३.२०२४ चे दुपारी २.३० वा. चे सुमारास, पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून पोलिस ठाणे कपिलनगर हद्दीतील अंकुऊ प्लाझा येथील शॉप नं. ३, टेकानाका ते नारी रोडवर, कपिलनगर, नागपुर येथे अवैधरित्या
जुगार खेळणाऱ्या ईसमांवर छापा टाकला असता,


१) योगेश हेमराज पार्वे, वय ४५,

२) आतीश श्यामरावजी सहारे, वय ३९ वर्षे,

३) सुरज गजराज पाल, वय २७ वर्षे,
४) विशाल हरीदास शंभरकर, वय ३४ वर्षे
हे सर्व जण ताश पत्यावर पैशाची बाजी लावुन जुगार खेळताना समक्ष मिळुन आले. तसेच फरार झालेला आरोपी क्र.
५) राजेश नंदनवार रा. मानेवाडा, नागपूर हा पळुन गेला.
आरोपींचे ताब्यातुन ताश पत्ते, ईतर साहित्य व नगदी असा एकुण ७६,४५०/-रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरूध्द पोलिस ठाणे कपिलनगर येथे अप क्रमांक 130/24 कलम 4,5 म. जु. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त उत्तर विभाग प्रमोद शेवाळे, पोलिस उपायुक्त परी ५ निकेतन कदम यांचे मार्गदर्शनाखाली, परि. क्र. ५ विशेष पथकाचे सपोनि. राजेंद यादव, पोहवा. अरूण चांदणे, रविकुमार शाहु, रविंद्र गावंडे, पोशि योगेश ताथोड,विवेक दोरशेटवार, विजय गिते व शारीक खान यांनी केली.


