
पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांचे विशेष पथकाची वाळु माफीयावर धडाकेबाज कार्यवाही…
पोलिस उपायुक्त, परिमंडळ ५ यांचे विशेष पथकाची (वाळु)रेती माफीयांवर मोठी कार्यवाही,वाहनांसह ५० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने.दि.(२०) चे संध्या ०७.०० वा. चे सुमारास पोलिस उपायुक्त परि. क्र. ५ निकेतन कदम यांचे विशेष पथक हे पोलिस ठाणे यशोधरानगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून पोलिस ठाणे यशोधरानगर हद्दीतील कामठी रोड, नाका नं. २ येथे रोडवर टिप्पर क्र. एम. एच. ४० – ६८६५ यास थांबवुन चेक केले असता, त्यामध्ये (वाळुची) रेतीची वाहतुक होताना दिसुन आली चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव


१) शब्बीर अली वल्द शैफ अली, वय ३४ वर्षे, रा. गणेशगंज, लखनादौन, जि. शिवनी (म.प्र.), ह.मु. भिलगाव बस स्टॉप जवळ, यशोधरानगर, नागपुर व क्लीनर याने त्याचे नांव

२) विशाल पांडुरंग उईके, वय २४ वर्षे, रा. भांडेवाडी, नागपुर

यांना (वाळुचे) रेतीचे वाहतुकीबाबत परवाना बाबत विचारपुस केली असता, यांनी त्यांचे जवळ (वाळु)रेती संबंधी कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगीतले. त्यांना अधिक विचारपुस केली असता, नमुद (वाळु)रेती ही स्वरा ट्रेडर्स चे पाठीमागुन भरून आणली असल्याचे त्यांनी सांगीतले. टिप्पर चालकास स्वरा ट्रेडर्स येथे नेले असता, त्याठिकाणी पथकाला भरपुर प्रमाणात (वाळुची) रेतीचा साठा तसेच, टिप्पर क्र. एम. एच. ३१ सि.क्यु. १८९२ मध्ये जे.सि.बी. क्र. एम.एच. ४० सि.बि. ७६६५ ने रेती भरणे सुरू असल्याचे दिसुन आले. तेथील टिप्पर चालक व जेसिबी चालक यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी आपले नांव
३) कैलास शंकुलाल उईके, वय २५ वर्षे, रा. गणेशगंज, लखनादौन, शिवनी, ह.मु. भिलगांव, नागपुर
४) कन्हैय्यालाल कैलासप्रसाद यादव, वय ३१ वर्षे, रा. भिलगांव बस स्टॉप जवळ, नागपुर
असे सांगीतले. जे.सी.बी. चालक
५) सारंग परमानंद कोवे, वय २२ वर्षे, रा. गोंड मोहल्ला, पारडी, नागपुर
याला सुध्दा रेतीसंबंधी विचारपुस केली असता, त्याने नमुद रेती
६) अश्वीन उर्फ विक्की अशोक गेडाम, वय २९ वर्षे, रा. मसाळा, जिभकाटे नगर, नागुपर
यांची असुन, व त्यांचे सांगणेवरून चोरीच्या(वाळुची) रेतीची वाहतुक करीत असले बाबत सांगीतले. आरोपी क्र. १ ते ६ हे संगणमताने स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता अवैधरित्या (वाळु) रेती चोरी करून वाहतुक करताना मिळुन आल्याने, आरोपींचे ताब्यातुन ०२ टिप्पर, ०१ जेसिबी व (वाळु) रेती असा एकुण ५०,३६,००० /- रू. चा मुद्देमाल ताब्यात घेवुन, आरोपी क्र. १ ते ६ यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदर कामगिरी पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अप्पर पोलिस आयुक्त उत्तर प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त परी.५ निकेतन कदम, यांचे मार्गदर्शनाखाली, परि. क्र. ५ चे
विशेष पथकाचे सपोनि. राजेंद्र यादव, योगेश महाजन, पोहवा. अरूण चांदणे, रविकुमार शाहु, पोअं. अंकुश, योगेश, चंद्रकांत व रोशन यांनी केली.


