हिंगणा येथील खुनाचा गुन्हे शाखा युनीट १ ने लावला छडा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपुर गुन्हे शाखा युनीट १ ने हिंगणा येथील खुनातील फरार आरोपींना अटक करुन उघड केला खुनाचा गुन्हा….

नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुर शहर गुन्हे शाखा युनिट १ ने पोलीस ठाणे हिंगणा येथील ३०२ भादंवि. चा गुन्हा हा उघडकीस आणलाय मिळालेल्या माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर यातील आरोपी निष्पन्न करून तसेच सायबर सेल येथील अधिकारी व अंमलदार यांच्या विशेष मदतीने तांत्रिक बाबींच्या उपयोग करून गुन्ह्यातील तिन्ही आरोपींचा अहोरात्र मेहनत घेऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना शिताफीनं अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी अलका दिनेश नगराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अप क्र.२७९/२४ कलम ३०२,३४ भादंवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.





या बाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी सौ. अलका दिनेश नगराळे, वय ४१ वर्षे, रा. वडगांव गुजर, पोस्ट गुमगांव, तह. हिंगणा, जि. नागपुर यांचे पती दिनेश हरीदास नगराळे, वय ५० वर्षे हे टेंभरी बुट्टीबोरी, नागपुर येथे ऑटो चालविण्याचे काम करीत होते, ते दि(१३) चे ०७.३० वा. चे सुमारास त्यांचे दुचाकी स्प्लेंडर प्लस एम. एच. ४० क्यु. ४२८६ ने ऑटो चालविण्याकरीता गेले असता, ते सायंकाळी घरी परत आले नाही गावात विचारपुस केली असता गावातील भुषण कापसे, वय २० वर्षे आणि सचिन खिरडकर, वय २३ वर्षे, यांनी फिर्यादीचे घरी येवुन सांगीतले की, त्यांचे पती समृध्दी महामार्ग ते वडगांव गुजर गावाजवळील कच्या रोडवर जखमी अवस्थेत पडलेले आहेत. फिर्यादी यांनी लगेच त्या ठिकाणी जावुन पाहीले असता, त्यांचे पतीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून जिवानीशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोक्यावर व शरीरावर कोणत्यातरी शस्त्राने गंभीर जखमी केले. फिर्यादी यांनी जखमी यांना उपचाराकरीता एम्स हॉस्पीटल येथे नेले असता, त्यांना डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले होते. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे हिंगणा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०२ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल होता.



गुन्हेशाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार यांनी सायबर सेल चे मदतीने तांत्रीक तपास करून तसेच, मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून आरोपींना निष्पण्ण केले व सापळा रचुन गुन्हयातील आरोपी १) प्रभाकर उर्फ बालु नारायण शिवरकर, वय ३४ वर्षे, रा. टाकळघाट, २) अमोल बारसुजी बारसे, वय २७ वर्षे, रा. सातगांव दुधाळा, बुट्टीबोरी ३) मंगेश विष्णुजी उईके, वय ३० वर्षे, रा.सावरगाव, जि. यवतमाळ यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली
असता, आरोपींनी नमुद गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना पुढील तपासकामी हिंगणा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमारसिंघल,सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल,सहा.पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा)अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चौधरी, सपोनि. सचिन भोंडे, पोहवा. नितीन वासनिक, बबन राऊत, सुमित गुजर, हेमंत लोणारे, विनोद देशमुख, सोनु भावरे, योगेश वासनिक, रितेश तुमडाम, शरद चांभारे, चंद्रशेखर भारती,पोशि शिवशंकर रोठे, स्वप्नील खोडके, रविंद्र राऊत व नितीन बोपुलकर यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!