जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणुक करणारी टोळी गजाआड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणुक करणारी टोळी गजाआड…

नागपूर (शहर प्रतिनिधी) – जास्त परताव्याचे आमिष दाखवून आमच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास तीन महिन्यानंतर ते १५ ते २० टक्के किंवा त्या पेक्षा जास्त रिटर्न मिळेल असे अधिक नफ्याचे आमिष दाखवून ५ कोटी ३९ लाख रु. फसवणुक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपींना नागपूर शहर गुन्हे शाखेने मुंबई येथे अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी अंकुरकूमार अग्रवाल रा.नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धंतोली पोलिस ठाण्यात भादवि कलम ४४०/२०२३ कलम ४२०,४०६,  ४१९ ४६७,४६८, ४७१,१७१,१२०(ब) भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्ये पोलिसांनी १) मंदार अनिरूद्ध कोलते रा.नागपुर २) सुरज विष्णुपद रा.मुबई, ३) मंगेश उर्फे दिनेश वामन पाटेकर रा. मुबई, ४) अल्पेश सुरेशभाई पटेल रा गुजरात ५) मोहम्मद जवाद फारूख बोरा उर्फ ​​भरत सुलेमान, रा.गुजरात ६) राजू बोईलाल मंडल, (वय ३८ वर्षे) रा. बी/५०२, रुबी टॉवर, सेक्टर ८, चारकोप, कांदीवली (प.) मुंबई ७) दिनेश रामअजोर मिश्रा, (वय ४२ वर्षे), रा.भाग्यलक्ष्मी सोसायटी, रोड नन. ५, सिंग इस्टेट, ठाकुर व्हिलेज, कांदीवली, पुर्व मुंबई यांना अटक करून यांच्याकडून ९९ लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला असून, फरार आरोपी नामे – १) मुकेश चव्हान २) मोहनिश बदानी (राहुल) ३) अमन पांडे ४) भरत उर्फ ​​सुलेमान ५) करन राजोरा ६) विकांत राजपुत ७) राकेश कुमार ८) दिनेश जोशी ९) राहुल गायकवाड १०) संदीप पाटील यांचा शोध सुरू आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, यातील नमुद आरोपींनी संगनमत करून यातील फिर्यादीस एक्स्ट्रीम नेटवर्क्स इंडिया प्रा.लि. कंपनी बाबतची माहीती देऊन या कंपनी मध्ये पैसे गुंतवल्यास तीन महिन्यात पैसे १५ ते २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रिटर्न मिळेल असे फिर्यादीस विश्वासात घेऊन त्यास आमिष दाखविले. तसेच उपरोक्त कंपनीचे खोटे एजेंट बनुन नकली डिमांड ड्राफ्ट दिले. असे वेळोवेळी फिर्यादीची नमुद आरोपींनी फसवणुक करून एकुण ५,३९,५०,०००/-रु. हे एक्स्ट्रीम नेटवर्क्स इंडिया प्रा.लि. कंपनीचे नावाने घेतले आहे. फिर्यादीचे सिक्युरिटीचे कोरे चेकचा जेव्हा नमुद आरोपींनी दुरूपयोग केला तेव्हा फिर्यादीस त्याची फसवणुक झाली आहे असे लक्षात आले. नमुद आरोपींनी फिर्यादीस एक्स्ट्रीम नेटवर्क्स इंडिया प्रा.लि. कंपनी मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फिर्यादीने गुंतवणूक केलेल्या ५,३९,५०,०००/-रु. रकमेचा अपहार करून विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशा फिर्यादीने दिलेल्या रिपोर्ट वरून नमुद आरोपीं विरूध्द पोलिस ठाणे धंतोली, नागपुर शहर येथे अप. क. ४४०/२०२३ कलम ४२०, ४०६, ४१९, ४६७, ४६८, ४७१, १७१,१२०(ब), ३४ भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर मार्फत सुरू आहे.



नमुद गुन्हयात पाच आरोपींना अटक केली असुन यातील पाहीजे आरोपी नामे राजू बोईलाल मंडल, (वय ३८ वर्षे) रा.वी/५०२, रूबी टॉवर, सेक्टर ८. चारकोप, कांदीवली (प.) मुंबई व दिनेश रामअजोर मिश्रा, (वय ४२ वर्षे), रा.भाग्यलक्ष्मी सोसायटी, रोड नं.५, सिंग इस्टेट, ठाकुर विलेज, कांदीवली, पुर्व मुंबई यांना आर्थिक गुन्हेशाखा, नागपूर शहर येथील अधिकारी व अंमलदार यांनी मुंबई येथे जाऊन सापळा रचून नमुद आरोपींना (दि.०५एप्रिल) रोजी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने १४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर अटक आरोपीतांकडुन एक स्कॉर्पियो वाहन, दागीने व कागदपत्रे जप्त करण्यात आलेले आहेत. सदर गुन्हयात आज पावेतो आरोपींकडुन फॉरच्युनर व हयुंडाई अलकॅजर या गाड्या जप्त करण्यात आल्या असुन एकुण ५०,००,०००/- रुपये किंमतीची तीन चारचाकी वाहने व बँक खाते गोठवुन रुपये ४९,१८,९९८/- असे एकणु ९९,१८,९९८/- रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.सदर गुन्हयाचा तपास सपोनि संतोष मुंढे हे करीत आहे



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) संजय पाटील पोलिस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा  मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा,अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली येथील सहा.पोलिस निरीक्षक संतोष मुढे व तपास पथकातील पोलिस अंमलदार प्रणाली माहुरे, राजेंद्र नेरकर हे करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!