नोकरीचे आमिष दाखवुन कोट्यवधीची फसवनुक करणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार नागपुर आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नोकरीचे आमिष दाखवून कोटींची फसवणुक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधारास छत्तीसगड येथुन केली अटक….

नोकरीचे आमिष दाखवुन कोट्यवधी रुपयाची फसवणुक करणारी टोळी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..







नागपूर (शहर प्रतिनिधी) – नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा फसवणुक करणाऱ्या टोळीतील फरार पाचव्या आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर छत्तीसगड मधून उचलण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी तानबा इंदुरकर (वय ६८ वर्षे), बँक कॉलनी, नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो.ठाणे गणेश पेठ येथे अप. क्र.१७७ २०२४ कलम-४२० ,४०६ ,४६५,४६७,४६८,४७१,१२०८,३८४,३८६,५०६,३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयात चार आरोपी अटक असुन फरार आरोपीला छत्तीसगड मधून ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात १) वैशाली उर्फ किशा उर्फ पुनम विश्वनाथ शेट्टीगार, वैशाली सुदर्शन एनैवार (वय ३६ वर्षे), २) सुदर्शन संजय एनैवार (वय ३७ वर्षे), ३) सिध्दार्थ संजय एनैवार (वय ३२ वर्षे) तिन्ही रा.प्लॉट नं.३४ एस रेल्वे कॉलनी, प्रताप नगर पो.ठा. प्रताप नगर शहर, ४) शाहनवज फिर्दोस खान (वय २५ वर्षे) रा.प्लॉट नं.५७ रमाई नगर नारी रोड, रहमानी मस्जीद जवळ कपील नगर, पो.ठा. कपील नगर, नागपूर, ५) विशाल उर्फ आची विश्वनाथ शेट्टीगार (वय ३२ वर्षे), रा.प्लॉट नं. ५७/ए, गल्ली नं.१, रामेश्वरी रोड, बस स्टॉप जवळ, पार्वती नगर, नागपूर या सर्वांना अटक केली आहे.



या बाबत अधिक माहिती अशी की, यातील आरोपींनी प्रॉपर्टी डिलर, लिज, आणि सिटी सर्वेचे काम करण्याचे आमिष दाखवून त्या माध्यमातुन फिर्यादीसोबत ओळख करून आणि फिर्यादीच्या वृध्दपणाचा फायदा घेऊन तसेच फिर्यादीच्या ४ कुटूंबियांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तसे खोटे कागदपत्रे बनवून तसेच इन्वेस्टमेंट प्लान मध्ये इन्वेस्ट करून डबल पैसे करून देण्याचे आमिष दाखवुन सर्व आरोपींनी संगनमताने वेळोवेळी फिर्यादीला व फिर्यादीच्या परिवाराला ठार मारण्याची भीती दाखवुन आणि धमकावून फिर्यादी कडून रोख व ऑनलाईन स्वरूपात एकुण ३ करोड १७ लाख रू. खंडणी घेऊन त्या बदल्यात बनावट सही केलेले चेक देऊन फिर्यादी व फिर्यादीच्या परिवाराचा विश्वासघात करून फसवणुक केली आहे.

अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून पो.ठाणे गणेशपेठ येथे वर नमुद  भादंवी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.नमुद गुन्हयात चार आरोपी अटक असुन गुन्हयामधील पाहीजे आरोपी नामे विशाल उर्फ आची विश्वनाथ शेट्टीगार, रा.नागपूर हा जि.बेमेतरा राज्य छत्तीसगड येथे असल्याचे गुप्त बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त तसेच तांत्रिक साधनांच्या मदतीने नमूद आरोपीचा शोध घेणे करिता पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पथकासह छत्तीसगड येथे जावुन तेथील स्थानिक पोलीसांचे मदतीने आरोपी ताब्यात घेतले व त्याने गुन्हा केल्याची कबूली दिल्याने त्यास गुन्हयात अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने (दि.३०मे) रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे. नमूद आरोपीकडे पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील,पोलिस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी सागर आव्हाड, पोहवा, पंढरी खोंडे, रविंद्र जाधव, मंगेश गौरकर, अविक्षणी भगत व सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार रोहीत मटाले यांनी केली. नमूद गुन्हयाचा तपास पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर येथील सहा पोलीस निरीक्षक सागर आव्हाड हे करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!