
आय.पी.एल क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट ३ ने घेतले ताब्यात…..
आय.पी.एल क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट ३ ने घेतले ताब्यात…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक ०६.०४.२०२४ चे २०.०० वा. ते २१.०० वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे अजनी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून अजिंक्य दिलीप जासुतकर, वय ३३ वर्षे, रा. हनुमान नगर, महात्मा गांधी गार्डन जवळ, अजनी, नागपूर याचे घरी रेड कारवाई केली असता, आरोपी हा आय. पी. एल मधील रॉयल चैलेन्जर बैगलोर विरूध्द राजस्थान रॉयल यांचे दरम्यान चालु असलेले लाईव्ह क्रिकेट मॅचवर सट्टयाची खायवळी करतांना प्रत्यक्ष मिळुन आला.



त्याचे ताब्यातुन एक मल्टीमिडीया मोबाईल, तिन ऑनलाईन मोबाईल, टिव्ही, सेटऑप बॉक्स, लॅपटॉप, सट्टा-पट्टीचे कागदपत्र, कॉम्प्युटर,प्रिंटर व ईतर साहित्य असा एकुण ५६, २१० /- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द पोलिस ठाणे अजनी येथे
कलम ४, ५ जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील ,पोलिस उपायुक्त (डिटेक्शन)निमित गोयल,सहा.पोलिस आयुक्त गुन्हेशाखा अभिजित पाटील,यांचे मार्गदर्शनाखाली,पोनि. मुकूंद ठाकरे, पोउपनि देवकाते, सफौ ईश्वर खोरडे, पोहवा. अमोल जासुद, अनुप तायवाडे, संतोष गुप्ता, प्रविण लांडे, नापोशि. संतोष चौधरी व पोशि. मनिष रामटेके यांनी केली.




