
अट्टल मोटारसायकल चोरटे कलमणा पोलिसांचे ताब्यात,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…
अट्टल मोटारसायकल चोरट्यांना कळमणा पोलिसांनी केली अटक…
नागपूर शहर (प्रतिनिधी) – कळमणा पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी 1) ललीत गणेश रेवतकर (वय 23 वर्षे), रा.वार्ड क्र.24 गल्ली नं.12 वसंत नगर जुना बाबुलखेडा देवश्री किराणा दुकान जवळ पो स्टे अजनी, 2) अभिषेक उर्फ धमा मोरेश्वर रामटेके (वय 22 वर्षे), रा.भगवान नगर प्लॉटक 170 गणेश पुस्तकालय गजानन बळम्र पोस्टे. अजनी या अट्टल मोटार सायकल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 2 लाख 99 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी रूपेश दिलीपराव माथुरकर (वय 29 वर्ष), रा. प्लॉ.नं. 428/35 सुभान नगर मज्जीत लाईन सुभाननगर मज्जीत जवळ पो.ठाणे. कळमणा, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 220/24 कलम 379,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की दि.(17)रोजी रात्री 12.30 ते सकाळी 6.30 वा चे दरम्यान फिर्यादी यांचे राहते घरी सदर अटक आरोपी ललीत रेवतकर व अभिषेक रामटेके तसेच पाहिजे आरोपी प्रक्षिक जाधव व आदित्य मेश्राम यांनी संगनमत करून फिर्यादीची बजाज पल्सर 220 गाडी क्र .एम .एच .49, बी.ए. 5827 रंग काळा किंमत. 40,000/- रु. हि मोटार सायकल घराच्या बाहेर लॉक करून ठेवली असता ती चोरी करून घेऊन गेले. या नंतर फिर्यादीने शोध घेतला असता त्याला मिळाली नाही तेव्हा सदर वाहन चोरी बद्दल तक्रार दिल्याने तक्रारीवरून पोस्टे. कळमना येथे 220/24 कलम 379 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना तांत्रीक पध्दतीचा अवलंब करून तसेच गुप्त बातमीव्दारा खात्रीशीर माहीती मिळाली कि, उपरोक्त आरोपीातांनी सदर चोरी केलेली मोटारसायकल पोस्टे. अजनी या भागातील चंद्र नगर येथे दिसुन आली वरून सदर ठिकाणी जाऊन तेथील गुप्त बातमीदारांना भेटलो असता व त्यांनी आरोपीतांची माहीती दिल्याने व सदर माहीतीची खात्री करून आरोपीतांची माहीती काढुन सदर उपरोक्त दोन्ही आरोपीतांना सापळा रचुन पकडण्यात आले. व त्यांना पोस्टे. ला आणुन पंचासमक्ष सविस्तर विचारपुस केली असता त्यांनी आपल्या कबुली बयानात पोस्टे. कळमना हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याचे तसेच आणखी इतर मोटारसायकल सुध्दा चोरी केल्याचे सांगितल्याने सदर आरोपी सोबत मोटारसायकल लपविलेल्या ठिकाणी जाऊन तेथे आणखी जप्त मुद्देमाल प्रमाणे एकुण 7 मोटार सायकली व आरोपींनी वापरण्यात आलेले मोबाईलसह एकुण 2,99,000/-रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यापुढील अधिक तपास सुरू असुन फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.

सदर कामगिरी ही पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल, सह पोलिस आयुक्त,अस्वती दोरजे, अप्पर पोलिस आयुक्त, उत्तर विभाग प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त परीमंडळ ५ निकेतन कदम, सहा.पोलिस आयुक्त कामठी विभाग विशाल क्षिरसागर,वरीष्ठ पोलिस निरीक्षक गोकुल महाजन,सपोनि उज्वल इंगोले,पोउपनि संतोष रामलोड सफौ.गंगाधर मुटकुरे, पोहवा. विशाल अंकलवार,विशाल भैसरे, दिपक,गुडडु, पोशि यशवंत अमृते,वसीम देसाई यांनी केली आहे.


