IPL जुगारावर लकडगंज पोलिसांचा छापा,तिघांना ताब्यात घेऊन १४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
आय. पी. एल. क्रिकेट सामन्यावर सट्टा(जुगार)खेळविणार्यांवर लकडगंज पोलिसांनी छापा टाकुन,तीन आरोपींसह,एकुण १४,४६,२००/- रू चा मुद्देमाल जप्त.
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्या भारतामधे T20 क्रिकेटचा थरार IPL चे सामने सुरु आहे या खेळामधे बरेच नवोदीतांना संधी मिळते व ते त्याचे सोनेही करतात तर काहींनी यालाच व्यवसाय करुन जुगार खेळवले जातात
त्यानुसार दि (२८) रोजी रात्री चे १०.४० वा. चे दरम्यान, लकडगंज पोलिसांचे तपास पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे हद्दीत बि.टी.पी हॉटेल, सतनामी नगर,लकडगंज, नागपूर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा जुगार सुरू आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, नमुद घटनास्थळी पथकाने छापा टाकला असता, तेथे १) अजय विजय सोनी, वय ३० वर्षे, रा. १३४, गणेश डेअरी जवळ,कोरबा, छत्तीसगढ २) विनय निलकमल वर्मा, वय २७ वर्षे, रा. घर नं. ९, जुना बस स्टॅण्ड, कोरबा, छत्तीसगढ ३)तरंग पवन अग्रवाल, वय २७ वर्ष, रा. मेनरोड, सितावाडी, कोरबा, छत्तीसगढ हे तिघे त्यांचा साथिदार व पाहिजे असलेला४) हरीष केसरवानी वय ४५ वर्ष रा. जुना बस स्टॅण्ड, कोरबा, छत्तीसगढ ५) हॉटेल संचालक उमेश शेंडे रा. आंबेडकर चौक, वर्धमान नगर, नागपूर यांचे मदतीने स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता संगणमत करून आय.पी.एल लाईव्ह क्रिकेट मॅचवर मोबाईलवरून संभाषण करून क्रिकेट सट्टयाची ऑनलाईन खायवळी करतांना प्रत्यक्ष मिळुन आले.
वरील सर्व आरोपींचे ताब्यातुन एक एल.ई.डी टिव्ही, सेट टॉप बॉक्स, रिमोट, अॅप्पल कंपनीचा एक लॅपटॉप, ३ मोबाईल फोन, रोख ७,२००/- रू व चार चाकी वाहन किया क्र. एम.एच १२ बी.एम ७७५५ असा एकुण १४,४६,२००/-रू. चा मुद्देमाल मिळाल्याने जप्त करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेवुन, त्यांचेविरूध्द पोलिस ठाणे लकडगंज येथे कलम ४, ५ महा. जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये कारवाई करण्यात आली.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सह पोलिस आयुक्त अस्वती दोर्जे,अपर पोलिस आयुक्त (उत्तर विभाग)प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त (परि ३ )गोरख भामरे, सहा.पोलिस आयुक्त (लकडगंज)श्वेता खाडे,यांचे मार्गदर्शनाखाली,वरीष्ठ पोलिस निरीक्षक जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे) साईनाथ रामोळ, पोउपनि संदिप शिंदे, पोहवा. सुखदेव गिरडकर,नापोशि आनंद मरस्कोल्हे,पोशि शकील शेख, मयुर बन्सोड व स्वप्नील तांदुळकर यांनी केली.