सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे…..
सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०२) ॲागस्ट २०२४ रोजी यातील फिर्यादी कान्हा जेठु निर्मलकर, वय २१ वर्षे, रा. प्लॉट नं. ९०, विजय नगर, कळमना, नागपुर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर दुचाकी क. एम.एच. ४९ बि.पी. ६२२५ किं ५०,०००/- रू. पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत, श्री शाम अॅग्रो फुट शॉप, संत्रा मार्केट येथे हॅन्डल लॉक करून व पार्क करून ते कामावर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी ठेवलेल्या ठिकाणाहुन चोरून नेली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गणेशपेठ येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासात गणेशपेठ पोलीसांचे तपास पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून,लखपती बस्ताराम फेडर, वय २७ वर्षे, रा. वार्ड नं. १३, पिंजारी मोहल्ला, तह. वाराशिवनी, जि. बालाघाट (मध्य प्रदेश)यास निष्पन्न करुन त्यास सापळा रचुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपीस अधिक विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्ह्याव्यतिरिक्त पोलिस ठाणे गणेशपेठ हद्दीत वाहनचोरीचे ईतर ०२ गुन्हे असे एकुण ०३ गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्ह्यात चोरी केलेले स्प्लेंडर दुचाकी वाहन क. एम. एच. ४९ बि. पी. ६२२५, स्प्लेंडर प्रो दुचाकी क. एम. एच. ३८ आर. ४६७८, होंडा ड्रिम युगा दुचाकी क. एम. एच. ४९ ए. एम. ४३८७ असे एकुण ०३ वाहने एकुण किंमती अंदाजे १,०५,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त(परीमंडळ ३)महक स्वामी,सहा पोलिस आयुक्त(कोतवाली विभाग) अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, गणेशपेठ पोलीस ठाणे चे वपोनि मच्छींद्र पंडीत, पोउपनि. मल्हारी डोईफोडे, पोहवा. अनिल दुबे, पोशि अश्विन गुमगांवकर, वैभव यादव, पवन, दलित लोखंडे, सुमेध नितनवरे व सागर धवन यांनी केली.