अट्टल वाहन चोरटा ईमामवाडा पोलिसांचे ताब्यात,उघड केले ४ गुन्हे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अट्टल वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन ईमामवाडा पोलिसांनी उंघड केले ४ वाहन चोरीचे गुन्हे….

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.यातील तक्रारदार वेदांत प्रविण भोयर, वय १८ वर्षे, रा. जुना बाबुलखेडा, अजनी, नागपुर हा दि(७)मे रोजी रात्री ८.००. ते १०.०० वा. चे दरम्यान, व्ही.आर. मॉल चे मागे, कॉन्व्हेंट समोर, रामबाग कॅालनी येथे  त्यांची पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्र. एम. एच. ४९ झेंड. १८८२ कि २५,००० /- रू. ची पार्क करून मॉल मध्ये गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची गाडी चोरून नेली.





फिर्यादी वेदांत प्रविण भोयर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे ईमामवाडा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हयाचे तपासात पोलिस ठाणे ईमामवाडा येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून सराईत गुन्हेगार रितेश उर्फ ददु अश्वजीत वानखेडे, वय २१ वर्षे, रा. पाचनल चौक, रामबाग, नागपूर यास निष्पन्न करुन ताब्यात घेतले असता त्याचे जवळ वाहनाबाबत विचारपूस केली असता, आरोपीने वर नमुद गुन्ह्यातील वाहन चोरी केल्याची कबुली दिली.



यावरुन आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेले वाहन किंमती २५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीला अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीची सखोल विचारपुस केली असता, त्याने वरील वाहन चोरीचे गुन्हयाव्यतीरीक्त पोलिस ठाणे ईमामवाडा हद्दीतुन ग्रे रंगाची होंडा युनिकॉर्न क्र. एम.एच. ४९ झेड. ७३०७ किंमती २०,०००/- रू. ची तसेच, पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा एम.एच. ४९ व्ही. २३३७ किं १५,०००/- रू. ची व पोलिस ठाणे अजनी हद्दीतुन सिल्व्हर रंगाची ड्रिम युगा गाडी क्र. एम. एच. ३१ ई.
एस. १४३२ किंमती ३०,००० /- रू. ची असे एकुण ०४ वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन चारही वाहने किं एकुण ९०,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त करून ०४ गुन्हे उघडकीस आणण्यात आले.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(दक्षिण विभाग) शिवाजीराव राठोड,पोलिस उपायुक्त (परि क्र. ४)विजयकांत सागर,सहायक पोलिस आयुक्त (सक्करदरा विभाग)हेमंत शिंदे
यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन ईमामवाडा चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, सपोनि. गणेश पवार, पोहवा. गणेश घुगुलकर, अमित पात्रे, भगवती ठाकुर, विरेंद्र गुळरांधे व चंद्रशेखर डेकाटे यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!