
कॅाटन मार्केट येथील वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा,२ महीलेची केली सुटका…
अवैध वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचा नागपूर शहर गुन्हे शाखेचा छापा…


नागपूर (शहर प्रतिनिधी) – स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता महीलांना पैशाचे आमिश दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करून पिडीतांना जागा उपलब्ध करुन देवून देहव्यापार चालणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करून 2 पिडीतांची सुटका केली आहे. आरोपीने पिडीतांना अधिक पैशाचे आमिष दाखवुन देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले अन् त्यांना जागा उपलब्ध करून दिली. या आरोपीला नागपूर शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण 25 हजार/- रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पोलिस ठाणे, गणेशपेठ नागपूर शहर हद्दी मध्ये जोशी ट्रेडर्स शॉप नं.44 फुले मार्केट नागपूर शहर, येथे आरोपी जय महादेव जोशी (वय 42 वर्षे),प्लॉट नं 21 रामकृष्णा नगर उमरेड रोड, दिघोरी नागपुर शहर हे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता महीलांना पैशाचे आमिष दाखवुन देहव्यापारास प्रवृत्त करून पिडीतांना जागा उपलब्ध करुन देवून देहव्यापार करवून घेतात. अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती वरिष्ठांना देऊन सदर ठिकाणी छापा टाकला असता ०२ पिडीतांची सुटका करण्यात आली. आरोपीने पिडीतांना अधिक पैशाचे आमिष दाखवुन देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले व त्यांना जागा उपलब्ध करून दिली. यातील आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण 25,610/- रु. मुद्देमाल पंचासमक्ष पंचनाम्यान्वये जप्ती पत्रीका प्रमाणे जप्त केले असुन आरोपींविरुध्द पोलिस ठाणे गणेशपेठ नागपूर शहर येथे कलम 370 भादवी सहकलम 8, 5,7, अनैतिक व्यापार अ प्रतिबंध कायदा 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

तसेच आरोपी जय महादेव जोशी ह्याच्या 1) पँटच्या खिश्यातुन रूपये 500 च्या तीन नोटा तसेच 100 रूपयाच्या 5 नोटा पैकी 500 रूपयांची 1 नोट या व्यतिरीक्त 500 रूपयांच्या 2 नोटा असा एकुण 2,000/- रूपये चा माल 2) एक मोबाईल ओप्पो कंपनीचा काळया रंगाचा मॉडल नं. रेनो 10 ज्याची किं. 20,000/- रू. कांउटर चे खाली शोकेस मध्ये एका लाल रंगाच्या पिशवी मध्ये ठेवलेल्या 500/-रु. च्या 27 नोटा असा एकुण 13,500 रू.माल हा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त, नागपूर शहर डॅा रविन्द्र सिंघल,, सह पोलिस आयुक्त,अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे), संजय पाटील , पोलिस उपआयुक्त (डिटेक्शन),सहाय्यक पोलिस आयुक्त (डिटेक्शन)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनात म.पो.नि. कविता इसारकर, पोउपनि. महेंद्र थोटे, पोहवा. प्रकाश माथनकर, लक्ष्मण चौरे, शेषराव राउत, अजय पोनीकर, अश्विन मांगे, कुणाल मसराम, लता गवई, आरती चौहान यांनी केली


