अवैध अग्नीशस्त्र बाळगणारा तसेच हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणार्यास सुरक्षा शाखेने घेतले ताब्यात…
अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या व हद्दपार आरोपींना अटक,गुन्हेशाखेच्या सामाजीक सुरक्षा पथकाची कामगिरी…
नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(३१) मे चे मंध्यरात्रीचे सुमारास ०१.४५ वा चे दरम्यान, गुन्हेशाखा
सामाजीक सुरक्षा विभाग पथक हे पोलिस ठाणे मानकापूर हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की,सराईत गुन्हेगार आमीर शेख बशीर शेख हा त्याचे घरी प्लॉट नं. ५६, मिनीमाता नगर, गोधनी रोड, मानकापूर हा अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगुन आहे.
अशा माहितीवरून त्याचे घरी जावुन चेक केले असता, नमुद आरोपी हा त्याचे जवळ एक देशी बनावटीचे पिस्टल व तिन जिवंत कारतुस असा एकुण ५३,००० /- रू चा मुद्देमाल अवैधरित्या बाळगतांना मिळुन आला. आरोपी हा कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने अग्नी शस्त्रासह समक्ष मिळुन आल्याने तसेच, त्याने सहपोलिस आयुक्त यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलिस ठाणे मानकापूर येथे आरोपीविरूध्द कलम ३ / २५ भा.ह.का सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा होत असल्याने आरोपीस
मुद्देमालासह पुढील कारवाईकरीता मानकापूर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले.
तसेच दुसर्या एका कार्यवाहीत दि(३०) चे रात्री ९.५५ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभाग पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे लिलाकुंज प्लॉट नं. ७५, न्यु मानकापूर, नागपूर येथे सार्वजनीक ठिकाणी हद्दपार ईसम फिरत आहे अशा माहितीवरून नमुद ठिकाणी गेले असता, त्या ठिकाणी एक संशयीत ईसम पोलिसांना पाहुन पळुन जाण्याचे तयारीत
असतांना त्यास सापळा रचुन ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव तबस्सुर उर्फ तस्सु वसीम अहमद वय २८ वर्ष रा. गल्ली नं. ९, ताजनगर, मानकापूर, नागपूर असे सांगीतले आरोपीचा अभिलेख तपासला असता तो पोलिस ठाणे मानकापूर येथुन पोलिस उपायुक्त परि. कं. २ यांचे हद्दपार आदेश क.
पोउपआ/परि २/हद्दपार १४ / २०२२ दिनांक २७.०८. २०२२ प्रामाणे नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हद्दीतुन ०२ वर्षा करीता हद्दपार असल्याचे समजले. यातील आरोपीचे कृत्य कलम १४२ म.पो.का अन्वये होत असल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी पोलिस ठाणे मानकापूर यांचे ताब्यात दिले.
वरील कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील.पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) निमीत गोयल,सहायक पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा)अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मपोनि. ललीता तोडासे व त्यांचे पथकाने केली.