स्पा मसाज च्या नावाखाली देहविक्रीचा गोरखधंदा करणाऱ्यांवर सामाजिक सुरक्षा विभागा छापा,३ पीडीतेंची केली सुटका

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्पा मसाज च्या नावाखाली देहव्यापार करणाऱ्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा,३ पीडीतेंची सुटका….





नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (२६) रोजी दुपारी ४.५० वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलिस ठाणे जरीपटका हद्दीत जिंजर मॉल पहिला माळा, जरीपटका, नागपूर शहर येथील ‘रिलॅक्स स्पा द हेअर ॲण्ड ब्यूटी’ येथे स्पा मसाज च्या नावाखाली देहविक्रीचा धंदा चालतो अशा गोपनीय माहीतीवरुन शहानीशा करुन त्या ठिकाणी सापळा रचुन छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन पिडीत मिळुन आल्या त्यातील दोन पिडीत हया पुर्वत्तर राज्यातील (नॉर्थ ईस्ट) येथील असल्याचे निष्पन्न झाले.



सदर स्पाचे चालक मालक राज्या व्यतीरिक्त परराज्यातील स्त्रियांना त्याचे स्पा मध्ये मसाजचे नावा खाली सेवा देत रिलॅक्स स्पा द हेअर अॅन्ड ब्युटी, येथे मिळालेल्या तीनही पिडीतांची सुरक्षित सुटका करण्यात आली. प्रत्यक्ष पिडीतांना नमुद व्यवसायाचे प्रलोभन देणारे दोन आरोपी १) मोहम्मद नासीर वल्द अब्दुल शकुर भाटी, वय ४८ वर्ष, रा. प्लॉट नं. ०८, लक्ष्मी प्लॉझा गॅलेक्सी अर्बन, पो.ठाणे. मानकापुर, नागपूर शहर २) फिरोज वल्द अब्दुल शकुर भाटी, वय ४५ वर्ष, रा. प्लॉट नं. ०८, लक्ष्मी प्लॉझा गॅलेक्सी अर्बन, पो. ठाणे. मानकापुर, नागपूर शहर हे हजर नसल्याने तसेच प्रयत्न करूनही मिळून आले नाही.



नमुद घटनास्थळी स्पाच्या मॅनेजर  कु. रक्षा उर्फ सना मनिश शुक्ला वय २२ वर्षे रा. विनोद ठाकरे यांचे घरी किरायाणे सेनगुप्ता हॉस्पीटल जवळ, रवी नगर, पो.ठाणे. अंबाझरी, नागपूर शहर
हयांना  सूचनात्रानवर सोडण्यात आले.तसेच  वर नमूद तीन्ही आरोपी विरूद्ध पोलिस ठाणे जरीपटका येथे अप. क्र. २९४/२०२४ कलम ३७०, ३४ भादवी सहकलम ४, ५, ७, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची कारवाई  पोलिस आयुक्त,डॅा रविन्द्र सिंगल सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे), नागपुर शहर
संजय पाटील,पोलिस उपायुक्त (गुन्हे) निमीत गोयल,सहायक
पोलिस आयुक्त (गुन्हे),डॅा अभिजित पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक कविता इसारकर, पोउपनि महेन्द्र थोटे,पोहवा प्रकाश माथनकर ,सचिन बढीये,नापोशि शेषराव राऊत , अजय पौनीकर. ,मनापोशि आरती चव्हान,पोशि कुणाल मसराम,अश्विन मांगे,समीर शेख, नितीन वासने,मपोशि पुनम शेंडे, सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा नागपुर शहर यांचेसह यशस्वी करण्यात आली.

 

 

या स्पा सेंटरचे  संचालक स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता महिलांना
पैशाचे आमिष देवून त्यांचेकडून देहव्यापार करवून घेत आहेत
पंचांसमक्ष रिलॅक्स स्पा द हेअर अॅण्ड ब्यूटी येथे रेड कारवाई केली असता, नमुद ठिकाणी आरोपी १) रक्षा उर्फ सना
मनिष शुक्ला, वय २२ वर्षे, रा. रवि नगर, सेनगुप्ता हॉस्पीटल जवळ, नागपुर व त्यांचे साथिदार पाहिजे आरोपी क.
२) मोहम्मद नासीर वल्द अब्दुल शकुर भाटी, वय ४८ वर्षे, ३) फिरोज वल्द अब्दुल शकुर भाटी दोन्ही रा. प्लॉट नं.
८, लक्ष्मी प्लाझा गॅलेक्सी अर्बन, मानकापूर, नागपूर हे तिघेही स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता पिडीत महिलांना पैशाचे
आमिष देवून, देह व्यापाराकरीता ग्राहकांकडुन पैसे घेवुन, देहव्यापारास जागा उपलब्ध करून महिलांकडून देह व्यवसाय
करवून घेतांना समक्ष मिळुन आले. आरोपींचे ताब्यातुन तिन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. आरोपींचे
ताब्यातुन अॅप्पल कंपनीचा आयफोन, रोख ५,००० /- रू व ईतर साहित्य असा एकुण ८५,११० /- रू. किंमतीचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरूध्द पोलीस ठाणे जरीपटका येथे कलम ३७०, ३४ भा.दं.वि., सहकलम ४,
५, ७ पिटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून, कारवाई करण्यात आली आहे. आरोपी क्र. १ यांना मुद्देमालासह
पुढील कारवाईस्तव जरीपटका पोलीसांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे.
वरील कामगिरी मा. पोलीस आयुक्त, नागपुर शहर, मा. सह पोलीस आयुक्त, नागुपर शहर, मा. अपर
पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), मा. सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे शाखा) यांचे
मार्गदर्शनाखाली, मपोनि. कविता ईसारकर, पोउपनि महेन्द्र थोटे, नापोअं. शेषराव राऊत, अजय पौनिकर, मनापोअं.
आरती चव्हाण, पोअं. नितीन वासनिक, अश्विन मांगे, समीर शेख, कुणाल मसराम व मपोअं. पुनम शेडे यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!