
खुनी हल्ला करणारे ३ आरोपीस अग्नीशस्त्रासह युनीट १ ने केले जेरबंद….
जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिन आरोपींना अग्नीशस्त्रासह युनीट १ ने अटक करुन , एकुण ५,८७,००० /- रू चा मुद्देमाल जप्त….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी मीर सैफ अली मीर अख्तर अली सय्यद, वय २६ वर्षे, रा. रॉयल रेसीडेंसी, पहीला माळा, लकडगंज, नागपुर यांचा प्रॉपर्टी डिलर चा व्यवसाय असुन त्यांनी १) शेख वसीम उर्फ चिया याचे जवळुन
१,००,०००/-रू. उधार घेतले होते. दिनांक २१.०२.२०२४ चे ०२.०० वा. चे सुमारास शेख वसीम उर्फ चिया हा त्याचे साथीदार मोहसिन खान उर्फ भुऱ्या ३) फैजान खान, ४) मोहम्मद अलीम मोहम्मद शरीफ ५) नितीन पिल्ले उर्फ मन्ना यांनी फिर्यादीचे घरात प्रवेश करून शेख वसीम उर्फ चिया याने फिर्यादीस हातबुक्कीने मारपीट केली व त्याचे ईतर साथीदारांनी बेडरूमचे दार बंद करून फिर्यादीचे बाजुला उभे होते, त्यावेळी शेख वसीम उर्फ चिया याने पिस्टल काढुन फिर्यादीस “मेरे एक लाख रूपये और अलगसे तेरे पास के पचास हजार रूपये अभी के अभी देना होगा नही तो तुझे अभी जान से मार ढुंगा’ असे म्हणुन फिर्यादीस जिवानिशी ठार मारण्याचे उद्देशाने, फिर्यादीचे दिशेने पिस्टल मधुन गोळी झाडली. फिर्यादी बाजुला सरकल्याने गोळी बाजुचे पिल्लरला लागली. गोळीचा आवाज झाल्याने घरातील मंडळी जागी झाली व ते ओरडल्याने आरोपी अॅक्टीवा गाडी व ऑटो ने तेथुन पळुन गेले.


याप्रकरणी फिर्यादी हे धास्तीत असल्याने त्यांनी दि.(२८). रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे लकडगंज येथे आरोपीविरूध्द कलम ३०७, १४७, १४८, १४९, ३८५, ४५२, ५०६(ब), २०१ भा.दं.वि., सहकलम ३, ५, २५, २७ भा.ह.का., सहकलम १३५ म.पो. का. अन्वये गुन्हा दाखल होता गुन्हयातील, आरोपी १) नितीन उर्फ मुन्ना गणेश पिल्ले, वय ३३ वर्षे, रा. मुदलीयार चौक, शांतीनगर, नागपुर २) मोहसिन खान उर्फ भुऱ्या शारीक खान, वय ३५ वर्षे, रा. प्लॉट नं. ७०२, मेश्राम दारू भट्टी जवळ, शांतीनगर, नागपुर यांना गुन्हेशाखा युनिट क्र. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेवुन लकडगंज पोलीसांचे ताब्यात दिले होते. गुन्हा घडल्या पासुन नितीन उर्फ मुन्ना गणेश पिल्ले, व त्याचे साथिदार हे मिळुन आले नव्हते गुन्हेशाखा युनिट क्र. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन शांतीनगर घाटा जवळ आरोपी वसीम उर्फ चिऱ्या अफजल शेख वय ४५ वर्ष रा. शांतीनगर घाट जवळ, नागपूर यास ताब्यात घेतले. आरोपी जवळुन दोन अग्नीशस्त्र मैगझीन असलेले व तिन जिवंत काडतुस तसेच एक मोबाईल फोन जप्त केला. तसेच त्याचा साथिदार नामे विजय दिगांबर महाजन वय ४३ वर्ष रा. वार्ड नं. १६, गेस्ट हाऊस बिअर बार समोर, कळमेश्वर, तसेच आरोपी आरीफ लतीफ शेख वय ३९ वर्ष रा. मातापुरा वार्ड नं. १७, कळमेश्वर या दोघांना कळमेश्वर येथुन ताब्यात घेतले. त्यांचे जवळुन एक शेंदरी रंगाची रेनॉल्ड ट्रिबर कंपनीची कार क्र. एम. एच ४० सि. एच ९१५६ व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

तसेच गुन्हेशाखा युनिट क्र. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी वरील गुन्हयात पाहिजे असलेले तिन आरोपी यांना अटक करून त्यांचे ताब्यातुन अग्नीशस्त्र, कार व मोबाईल असा एकुण ५,८७,००० /- रू चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील तपास कामी लकडगंज पोलिसांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास
सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंन्द् सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) संजय पाटील पोलिस उपायुक्त डिटेक्शन निमीत गोयल,सहा.पोलिस आयुक्त(गुन्हे) अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखालील पोलिस निरीक्षक मुकूंद ठाकरे, पोउपनि मधुकर काठोके, सफौ. सतिश पांडे, दशरथ मिश्रा, पोहवा. विजय श्रीवास, संतोषसिह ठाकुर, प्रविण लांडे, पोशि दिपक लाकडे, जितेश रेड्डी, दिपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार व अनिल बोटरे यांनी केली.



