IPL जुगारावर युनीट ३ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…
आय. पी. एल. क्रिकेट मॅचवर जुगार सट्टा खायवळी करणाऱ्यास युनीट ३ ने घेतले ताब्यात….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(४)रोजी रात्री ९.३० वा.चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट ३ चे पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत द्वारका नगरी, चकोलीवाडी, खरबी, वाठोडा, नागपूर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू आहे
अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, युनीट ३ चे पथक नमुद घटनास्थळी गेले असता, तेथे राहणारा आरोपी पवन पांडुरंग मंगर, वय ३२ वर्ष रा. द्वारका नगरी, चकोलीवाडी, खरबी, वाठोडा, नागपूर हा त्याचा साथीदार व या गुन्ह्यात पाहीजे असलेला आरोपी राकेश नरूले रा. नागपूर याचे मदतीने स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता संगणमत करून आय.पी.एल लाईव्ह क्रिकेट मॅचवर रॉयल चैलेंज बैंगलोर विरूध्द गुजरात टाइटन्स वर मोबाईलवरून संभाषण करून क्रिकेट सट्टयाची ऑनलाईन खायवळी करतांना प्रत्यक्ष मिळुन आला. आरोपीचे ताब्यातुन एक एल.ई.डी टिव्ही, सेट टॉप बॉक्स, रिमोट, ३ मोबाईल फोन, मैच चे सौदे लिहीलेले पाने व ईतर साहित्य असा एकुण ५९,२००/- रू. चा मुद्देमाल मिळाल्याने जप्त करण्यात आला.
यावरुन आरोपीस ताब्यात घेवुन, त्यांचेविरूध्द पोलिस ठाणे वाठोडा येथे कलम ४, ५ महा. जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये कारवाई करून आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई करीता वाठोडा पोलिसांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) निमित गोयल,सहा पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट ३ चे पोलिस निरीक्षक. मुकूंद ठाकरे, पोउपनि नवनाथ देवकाते, सफौ. ईश्वर खोरडे, पोहवा. मुकेश राउत, अमोल
जासुद, अनुप तायवाडे, पोअं. संतोष चौधरी, अनिल बोटरे व प्रविण लांडे यांनी केली.