नागपुर गुन्हे शाखा युनीट ५ ने उघड केले फसवणुकीचे ५ गुन्हे….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नागपूर गुन्हे शाखा युनीट ५ ने उघड केले ५ फसवणुकीचे गुन्हे,एकुन ३ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त…..

नागपूर (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर गुन्हे शाखा युनिट ५ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून ६ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून फसवणुकीचे ५ गुन्हे उघड करून ३ लाख ६७ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी  १) सौ.संगीता रमेश खरे (वय ४८ वर्ष), रा.बेझनगबाग पो.ठाणे जरीपटका नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचपावली पोलिस ठाण्यात ३३३/२०२४, कलम ४१९,४२०, आणि ३४ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच फिर्याद क्र २) सौ.रंजना जयंन्द्र बरडे (वय ५२ वर्ष), रा.खापरखेडा, जि.नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोराडी नागपूर पोलिस ठाण्यात ११०/२०२४ कलम ४२० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.फिर्यादी क्र ३) पुष्पा जगन्नाथ साहु (वय ४८ वर्ष), रा.हिवरीनगर पो.ठाणे नंदनवन नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदनवन नागपूर पोलिस ठाण्यात १६२/२०२४ कलम ४२० आणि ३४ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्याद क्र ४)सारीका मधुकर बोरकर (वय ३० वर्ष) रा.संताजीनगर पो.ठाणे जुनी कामठी नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जूनी कामठी नागपूर पोलिस ठाण्यात १९४/२०२४ कलम ४२० आणि ३४ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.





त्याअनुषंगाने या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी नामे १) हरीष बाबुलाल दाबी (वय २७ वर्ष), रा.प्लॉट नंबर ९७०,रघुवीरनगर, बिसनलाल चे घरी किरायेने नवी दिल्ली, २) अरुण अर्जुन परमार (वय १९ वर्ष) रा.प्लॉट नंबर ९७१, रघुवीनगर, पन्नालाल चे झुकणे नवी दिल्ली. ३) सौ.पारू जितु परमार (वय २० वर्ष) रा.शिवविहार ६३, चौकी मागे, पोलिस चौकी, उत्तमनगर दिल्ली, ४) सौ.रतनी सिताराम सोलंकी (वय ४० वर्ष), रा.घर नंबर ९७०, घोडेवाले बसरघुबारागंज, रघुवीरनगर पो. ठाणे ख्याला दिल्ली, ५) श्रीमती पुजा नरेश सोलंकी (वय २२ वर्ष) रा.बाडेबारागंज गंज ८४२, रघवीनगर दिल्ली, ६) श्रीमती गोपी जिवा सोलंकी (वय ५२ वर्ष), रा.झुगी नंबर ११६, शादीपुर डीपो मेट्रो स्टेशन के पास, पोलिस अधिकारी शादीपुर डीपो दिल्ली यांना अटक केली आहे. आणि यांच्याकडून गुन्हा करताना वापरलेले कपडे व मोबाईल फोन ३ व ५१ ग्रॅम सोन्याचे दागीने व रोख रक्कम २३,०००/-रू असा एकूण ३,६७,७००/-रू. चा मुद्देमाल हा जप्त केला आहे.तसेच यागुन्ह्यातील फरार आरोपी ७) सौ. रजनी गोपुर उर्फ ​​राजु सोळखी (वय ३० वर्ष), रा.दिल्ली ८) तृतीय पंथी रूही सिताराम सोलंकी (वय २० वर्ष), रा.दिल्ली, ९) अजय सीताराम सोलंकी (वय २० वर्ष), रा.दिल्ली यांचा शोध सुरु आहे



या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ६/४/२०२४ रोजी संध्याकाळी ५.३० ते रात्री ८.३० वा चे दरम्यान शनीचरा बाजार कमाल चौक नागपुर येथील फसवनुकीचा गुन्हा पोलिस ठाणे पाचपावली येथे  दाखल करण्यात आला होता सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे व तांत्रीक विश्लेशनावरून सदर गुन्हयातील अटक आरोपी क्र.१ व २ हरीष दाबी व अरुण परमार यांचे ताब्यातील रूमची झडती घेतली असता सदर रूम मध्ये १० कपड्यांच्या बॅग मिळून आल्या त्यात ७ बॅग ह्या महिलांच्या कपड्याच्या होत्या. आरोपी क्र.१ व २ यांना ताब्यात घेऊन अधिक विचारपुस केली असता त्यांचे सोबत सदर गुन्हयात अटक आरोपी ३ते ६ व पाहीजे आरोपी क्रमांक ७ ते ८ सोबत राहत आहेत. ते महीला आरोपी हे बर्डी रेल्वे स्टेशन नागपूर येथे दिल्ली जाणे करीता निघाल्या आहेत. अशा माहीती वरून सदरची माहीती वेळीच पोलिस कन्ट्रोल रूम नागपूर येथे वायरलेस द्वारे दिली असता पोलिस कन्ट्रोल रूम नागपूर यांनी पोलिस ठाणे सिताबर्डी, पोलिस ठाणे गणेशपेठ व गुन्हे शाखा युनिट ३ नागपूर शहर यांना दिली. सर्व पथके तात्काळ रेल्वे स्टेशन सीताबर्डी नागपूर येथे गेले असता युनीट ५ व  पोलिस ठाणे सिताबर्डी येथील स्टाफसह नमुद ठिकाणी पोहचुन आरोपी सौ.पारू जितु परमार व सौ.रतनी सिताराम सोलंकी यांना ताब्यात घेतले. त्यांचे कडुन सदर गुन्हयात फसवणुक केलेले दागीने व नगदी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असे एकुन २ पुरुष आरोपी व ४ महीला आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्या कडुन ५ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ३,६७,७००/-रू. चा माल माल हा जप्त करण्यात आला आहे.



सदरची कारवाई पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल, सहपोलिस आयुक्त,  अश्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त (गुहे) संजय पाटील, पोलिस उपायुक्त, (डिटेक्शन) गुन्हे शाखा नागपूर शहर,निमीत गोयल ,सहा पोलिस आयुक्त ,डॉ.अभीजीत पाटील (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट.५ वरीष्ठ पोलिस निरीक्षक राहुल शिरे,पोउपनि रोटे,ठाकुर,पोहवा रोनाल्ड एन्थोनी, वाघ,चुटे,राठोड ,बांबळ,विशाल नागभिडे,कारेमोरे,पोशि अमोल भक्ते,सुधीर तिवारी  ,सचिन चव्हान,निखिल जामगडे  तसेच पोलिस ठाणे सिताबर्डी नागपूर येथील  अधिकारी आणि कर्मचा-यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!