
कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्यांना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेऊन जनावरांची केली सुटका,९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या २ आरोपींना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेऊन केली ६ गोवंशीय जनावरांची सुटका,एकुण ९,०८,८४० /- रू. चा मुद्देमाल केला जप्त….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे पाचपावली चे अधिकारी व अंमलदार हे दिनांक ०२.०४.२०२४ चे ०५.५० वा. ते ०७.२५ वा. चे दरम्यान,पेट्रोलींग करीत असतांना खात्रीशीर माहितीवरून, पाळत ठेवुन, पो. ठाणे हद्दीत बाबा बुध्दाजी नगर गुरूद्वारा समोरील ८० फुट आमरोडवर सार्वजनीक ठिकाणी, एका टाटा योध्दा वाहन क्र. एम. एच. ३६ ए. ए. ३३४३ यास थांबवुन रेड केली असता, त्यामध्ये एकुण ०६ जिवंत गोवंशीय जनावरे यांना कोंबुन, त्यांना कृरतेने व निर्दयतेने वागणुक देवुन, अवैधरित्या कत्तल करण्याकरीता वाहतुक करताना मिळुन आले.जनावरांबाबत
अधिक विचारणा केली असता, वाहन चालक आरोपी १) सुनिल हिरदुलाल बोरकर, वय २५ वर्षे, रा. गाव चंगेरा,पोस्ट सतोना, जि. गोंदीया व त्याचा साथीदार आरोपी २) अहबाज निसार वल्द निसार खान, वय ३० वर्षे, रा. गाव चंगेरा, पोस्ट सतोना, जि. गोंदीया, ह.मु. टेका नई वस्ती, हबीब नगर, कुरेशीचे घरी किरायाने, पाचपावली, नागपूर यांनी संगणमत करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता नमुद जनावरांची वाहतुक करीत असल्याचे सांगीतले. आरोपींचे
ताब्यातुन नमुद ०६ गोवंशीय जनावरे व एक टाटा योध्दा वाहन, व नगदी असा एकुण किंमती अंदाजे ९,०८,८४० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकुण ०६ जिवंत गोवंशीय जनावरे यांची सुटका करण्यात येवुन त्यांना गोरक्षण केन्द्र, नागपूर येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी फिर्यादी पोहवा. किशोर गरवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे पाचपावली येथे आरोपींविरूध्द कलम ५, ५ (अ), ५(ब), ९, ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-१९७६, सहकलम ११(१) (क) प्राणी कुरता अधिनियम – १९६० अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपी क्र. १ व २ यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.


सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अप्पर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे,उत्तर विभाग,पोलिस उपायुक्त(परि क. ३),गोरख भामरे,सहा. पोलिस आयुक्त लकडगंज विभाग श्वेता खाडे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. बाबुराव राऊत, सपोनि. सोमवंशी, पोउपनि महेश घोडके, पोहवा. किशोर गरवारे, लक्ष्मण शेंडे, सुरेंद्र तायडे, पोअं. राकेश सिंग, पंकज ढबरे व अनुज ठाकुर यांनी केली.



