अट्टल मोटारसायकल चोरट्यास हिंगणा पोलिसांनी अटक करुन ११ मोटारसायकल केल्या जप्त…
अट्टल मोटारसायकल चोरट्यांना हिंगणा पोलिसांनी केली अटक,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघड करुन ११ मोटारसायकल केल्या जप्त….
नागपूर (शहर प्रतिनिधी) – हिंगणा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून अट्टल मोटारसायकल चोरट्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील 11 मोटारसायकली ज्यांची एकूण किं.4 लाख 15 हजार आहे या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी नाव – मुकेश मनोहर नारवरे, (वय 43 वर्षे), रा.मोहगाव झिल्पी, ता.हिंगणा, जि. नागपूर ज्यांची एक मोटारसायकल चोरी गेली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मध्ये पोलिसांनी 1) रितीक श्रीराम वाघाडे (वय 23 वर्षे), रा.हिंगणी धामनगाव, वार्ड क्र.2, पोस्ट हिंगणी ता.सेलु, जि. वर्धा, 2) प्रणिकेत केशवराव नागोसे (वय 19 वर्षे), रा.हिंगणी, वार्ड क्र.4, पोस्ट हिंगणी ता. सेलु, 3) रवींद्र उर्फ रवी वामन मढवे,(वय 34 वर्षे), रा.गळव्हा, पोस्ट- करळगाव, ता.बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ यांना अटक करून 678/23 कलम 379, 34 भादवि व अप क्र.163/24 कलम 379, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नमुद गुन्हयातील आरोपींना अटक करून नमुद गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले तसेच नमुद आरोपींनी मिळून पोलिस ठाणे हिंगणा, नागपूर शहर येथील दाखल अप क्र. 678/23 कलम 379, 34 भादवि व अप क्र.163/24 कलम 379, 34 भादवि चा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने, नमुद आरोपीतांना अटक करून विश्वासात घेऊन पुढील सखोल तपास केला असता, आरोपींनी सदर गुन्हयातील वाहनासोबतच नागपूर व वर्धा शहरातील इतर वेगवेगळ्या ठिकाणाहुन आणखी मोटर सायकल्स चोरल्या असल्याचे कबुल केले. आरोपींकडुन वर नमुद प्रमाणे एकुण 11 वाहने जप्त करून पोलिस ठाणे हिंगणा, नागपूर शहर येथे जमा करण्यात आली आहेत. नमुद वाहनाच्या चोरीच्या गुन्हयाबाबत माहीती घेतली असता, पुढील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत, पोलिस ठाणे कळमना येथे अप क्र.152/2016 कलम 379 भादवि, पोलीस ठाणे वर्धा शहर अप क्र. 372/23 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हे दाखल असुन, संबंधीत पोलिस ठाणेला गुन्हयाच्या आरोपीतांवावत माहीती देण्यात आली आहे
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अऱ्श्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त,दक्षिण विभाग शिवाजीराव राठोड,पोलिस उपायुक्त परी.१ अनुराग जैन,सहा.पोलिस आयुक्त एमआयडीसी विभाग,सतिशकुमार गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे हिंगणा येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद गोडबोले, सपोनि पांडुरंग जाधव, व पोलिस अंमलदार आनंद वानखेडे, अजय गिरडकर, नागेश दासरवार, संतोष येलुरे, विनोद दुरतकर व महीला पोलिस अंमलदार मनिषा भेंडारकर, जयश्री किरवे, दिपाली वैरागडे व वैशाली सांडेल यांनी केली आहे.