
बिटकॅाईनच्या माध्यमातुन लाखोंची फसवणुक करणाऱा मलेशिया येथील निवासी असलेल्या मुख्य सुत्रधारास दिल्ली येथुन केली अटक,नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी…
बिटकॉईनच्या नावाने फसवणूक करणाऱ्या मलेशियाच्या सायबर गुन्हेगारास नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक.….
नागपूर (प्रतिनिधी) – बिटकॉईनच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट नफा देण्याच्या नावाखाली नागपुरकरांची फसवणूक करणाऱ्या मलेशियाच्या सायबर गुन्हेगाराला नागपूर पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केली.माईक लुसी उर्फ बहारूद्दीन बिन युनूस (रा.मलेशिया) असे आरोपीचे नाव आहे. माईक याने भारतात निषेध वासनिक नावाच्या दलालाला हाताशी धरुन संपूर्ण राज्यात कोट्यवधीने गंडा घातला होता.


सदर आरोपी हा मलेशियाचा नागरीक असुन तो गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. सदर गुन्हयातील इतर चार आरोपींना तात्काळ अटक करुन तपास सुरु करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी –

१)निषेध वासनिक रा.नागपूर,

२)शामी जैस्वाल रा. गोंदिया,
३)कृष्णा भांडारकर रा.गोंदिया,
४)अभिजीत शिरगीरवार, रा.नागपूर
गुन्ह्यातील या आरोपींना यापुर्वी अटक करुन यांच्या विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले आहे. यातील मुख्य आरोपी- माईक लुसी उर्फ बहारुद्दीन बिन मोहम्मद युनुस, रा.मलेशिया यास ५ जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे.
गुन्हयातील अटक आरोपी माईक लुसी उर्फ बहारुद्दीन बिन मोहम्मद युनुस यांनी ‘फ्युचर बिट कंपनी’ स्थापन करुन हॉटेल रेडीसन्स ब्ल्यु येथे सेमीनार आयोजीत करुन सेमीनार दरम्यान उपस्थितांना बिट क्वाईन बाबत माहिती देवुन गुंतवणुकदारांनी त्याच्या ‘फ्युचर बिट कंपनी’ चे माध्यमातुन बिटक्वॉईन मध्ये गुंतवणूक केल्यास ९० दिवसात बिटक्वॉईन मध्ये गुंतविलेली रक्कम दुप्पट होईल असे सांगितले, त्या करिता त्याने त्याच्या कंपनीची वेबसाईट वर भेट देऊन बिटक्वॉईन खरेदी करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.
परंतु नंतर २०१७ मध्ये वेबसाईट बंद करुन ‘फ्युचर बिट कंपनी’ चा संचालक माईक लुसी उर्फ बहारुद्दीन बिन मोहम्मद युनुस हा फरार होवून बिटक्वॉईन गुतवणुकदारांशी संपर्क तोडून बिटक्वॉईन मध्ये गुंतविलेल्या रक्कमेवर आश्वासीत स्वरुपातील लाभ व त्यावर मिळणारा लाभ न देता फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांची रक्कम ३८,२६,७७५/- रुपयांनी फसवणूक केली.
सदर फरार आरोपीचा नागपूर शहर पोलिस कसुन शोध घेत असताना त्याचे लुकआउट सर्क्युलर जारी केले होते. सदर फरार आरोपी दिल्ली एअरपोर्ट येथुन हवाई मार्गाने पलायन करण्याच्या तयारीत असताना दिल्ली एअरपोर्ट ॲथॉरिटीने त्यास ताब्यात घेऊन नागपूर शहर पोलिसांना कळविले. पोलिस आयुक्त, नागपूर शहर अमितेश कुमार तसेच अर्चित चांडक, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सपोनि संघर्षी, पोहवा योगेश , निलेश, आर्थिक गुन्हे शाखा हे पथक तात्काळ दिल्ली येथे रवाना झाले व त्यांनी सदर फरार आरोपीस ताब्यात घेतले. सदर आरोपीस (दि.१२जानेवारी) पर्यंत पोलिस कोठडी मिळाली असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि मुढे, आर्थिक गुन्हे शाखा हे करीत आहेत.


