
गोडाऊन मधुन बॅटरी चोरणारे कपील नगर पोलिसांचे ताब्यात,१० गुन्हे केले उघड…
गोडावुन मधुन बैटरी चोरी करणाऱ्यास कपीलनगर पोलिसांनी केले जेरबंद…
नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी रविंदरसिंग गमदुरसिंग भामरा, वय ४८ वर्षे, रा. प्लॉट. नं. १, सिध्दार्थ नगर, पाचपावली, नागपुर यांचे पोलिस ठाणे कपिलनगर हद्दीत उप्पलवाडी, कामठी रोड, सि.एन-२ शेड नं. २ येथे प्लॅटीनियम पॉलीपॅक नावाचे गोडावुन आहे. नमुद गोडावुन मध्ये ई रिक्षा ठेवलेल्या असतात. दिनांक १२.१२.२०२३ चे २.०० वा. ते दि. १६.१२.
२०२३ चे ११.३० वा. चे दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे गोडावुन मध्ये प्रवेश करून, ई रिक्षा मधील तसेच ईतर ठेवलेल्या ईस्टमॅन कंपनीच्या १२ व्होल्टच्या बॅटरी एकुण ७६ नग, किंमत प्रती नग २,०००/- रू असा एकुण १,५२,००० /- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे
कपीलनगर येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३८०, ४६१ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात कपिलनगर पोलिस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून, गुन्हातील आरोपी यास निष्पन्न केले व मिळालेल्या माहितीवरून, सापळा रचुन


आरोपी क्र. १) समीर अली जावेद अली वय २० वर्ष रा. नारी, म्हाडा कॉलोनी बिल्डींग नं. ६७, क्वार्टर नं. १०४८, नागपुर

यास ताब्यात घेवून त्यांची घरझडती घेतली असता चोरीस गेलेला मुद्देमाला पैकी ४ बॅटरी मिळुन आल्या. आरोपीची सखोल विचारपूस केली असता, त्यांने नमुद गुन्हा त्याचे साथिदार

आरोपी क्र. २) गोविंद काशीराम साखरे वय २१ वर्ष रा प्लॉट नं. २७, स्वामी नगर, नारी रोड
३) आकाश विजय पाली वय २३ वर्ष रा. म्हाडा क्वार्टर,नागपुर
यांचे सह संगणमताने केल्याचे कबुल केले.आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपीं कडुन गुन्हयातील चोरी केलेला उर्वरीत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच आरोपींनी काही बॅटरी
आरोपी क्र. ४) रंजित अच्छेलाल शाहु वय २७ वर्ष रा. शनी मंदीर
जवळ, कळमणा
यास विक्री केल्याचे सांगीतल्याने त्यास सुध्दा नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपींचे ताब्यातुन चोरी गेलेल्या मालापैकी ईस्टमॅन कंपनीच्या १२ व्होल्टच्या बॅटरी एकुण ७२ नग बॅटरी एकुण
किंमत १,४४,०००/– रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच तपासा दरम्यान आरोपींनी दिलेल्या कबुली वरून पोलिस
ठाणे कपिलनगर येथील ७ गुन्हयातील तसेच पोलिस ठाणे जरीपटका येथील २ गुन्हयातील व पोलिस ठाणे पाचपावली
येथील १ अशा एकुन १० गुन्हयातील ३१ बॅटरी अंदाजे किंमत ९३,००० /- रू चा व एक अॅक्टीव्हा वाहन क्र. एम.एच ३१ सि.एक्स ६४०३ किमती २०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कपिलनगर पोलिसांनी बॅटरी चोरीचे १० गुन्हे उघडकीस आणुन एकुण १०३ बॅटरी व एक मोपेड वाहन असा एकुण २,५७,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपायुक्त (परि क्र. ५) निकेतन कदम,सहाय्यक पोलिस आयुक्त जरीपटका विभाग संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शनाखाली, वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) भरत शिंदे, सपोनि राजेन्द्र यादव, पोउपनि मल्हारी ताळीकोटे, अमोल नागरीक,शाम वारंगे, सचिन धात्रक मपोउपनि किर्ती आवळे, सफौ राजेश ठाकुर, पोहवा ईमरान शेख, खेळकर, भंगाडे, काळबांडे, नापोअ इंगळे, राठोड, पोशिपाई प्रविण ईनवाते, सुरेश वरूडकर, जाधव, शाहु, साकडे व होमगार्ड सुधिर वाल्दे यांनी केली.


