गुंतवनुकीच्या नावाखाली करोडोंची फसवनुक करणाऱ्यास नागपुर आर्थिक गुन्हे शाखेने कोलकाता येथुन घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गुंतवणूकदारांची करोडोंची फसवणूक करणारा नागपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

नागपूर (शहर प्रतिनिधी) – IX Global आणि TP Global कंपनीत गुंतवणूक करण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची करोडोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने कोलकत्ता येथून अटक केली आहे. त्याच्यावर नंदनवन, पोलिस ठाण्यात फिर्यादी विक्रम बजाज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अप.क्र. ९४/२०२४ कलम ४२०, ४०६, १२० (ब), ४१८, ३४ भादंवि. सहकलम ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान कायदा (सुधारणा) २००८ व सह कलम ३ एमपीआयडी.१९९९ अंतर्गत गुन्हा दाखल होता





याबाबत अधिक माहिती अशी की,दि(२४)फेब्रुवारी २०२४ रोजी यातील आरोपी सुरज सावरकर हा आय एक्स ग्लोबल (IX ACADEMY PRIVATE LIMITED) कंपनीत ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडींग, शेअर्स मार्केट, क्रिप्टो मार्केट यांचे एज्युकेशन देण्याचे काम करत असुन यातील विक्रम बजाज व त्याचे मित्रांना ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडींग मध्ये गुंतवणुक केल्यास ५ ते १५ टक्के नफा मिळतो. अशी बतावणी करून आरोपीने दिलेल्या पि.आर. ट्रेडर्स, एम.आर. ट्रेडर्स, आर. के. ट्रेडर्स, ग्रिन व्हॅली अॅग्रो, टि.एम. ट्रेडर्स सर्व कँनेरा बँक कोलकता शाखा, चे वेगवेगळे अकाउंट नंबर देवुन त्यामध्ये टि.पी. ग्लोबल, एफ.एक्स. या ब्रोकर वेबसाईटवर पैसे गुंतवण्याकरीता टाकण्यास सांगीतले. त्यानुसार त्यांनी पैसे टाकले. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्रांनी पैसे विड्रॉल करण्याकरीता TP GLOBAL फॉरेक्स ब्रोकर वेबसाईटवर रिक्वेस्ट टाकली असता अद्याप पावेतो गुंतवणुक केलेली रक्कम परत मिळाली नाही.



तेव्हा नंतर फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलिस स्टेशन नंदनवन येथे अप. क्रं. ९४/२०२४ कलम ४२०, ४०६, ३४ भा.दं.वि. सहकलम ६६ (ड) माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारणा) २००८ सहकलम ३ एम.पी. आय.डी. (MPID) अॅक्ट १९९९ अन्वये दाखल करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.), मुंबई, कोलकता व नागपूर पोलीस यांनी आरोपी विराज सुहास पाटील व इतर यांचेविरूध्द गुन्हे दाखल केले असुन यातील आरोपी विराज सुहास पाटील हा अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.) यांच्या गुन्हयांमध्ये न्यायालयाचे आदेशाने कोलकता मध्यवर्ती कारागृह येथे असलेला आरोपी विराज सुहास पाटील यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोलकता येथे जावून न्यायिक कारवाई पुर्ण करून आरोपी विराज सुहास पाटील याला कोलकता (पश्चिम बंगाल) राज्य येथुन रितसर नमुद गुन्हयात अटक करून आर्थिक गुन्हे शाखा नागपूर शहर येथील गुन्हयात पी. सी. आर. कामी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



अशा प्रकारे सदर कारवाई पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल,अपर पोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील,पोलिस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक भारती गुरनुले,पोहवा शरद कोकाटे, गजानन गिरी, योगेश निघोट, मपोहवा योगीता पोटभरे, चापोशि मंगेश गौरकर यांचे पथकाने केली असुन पुढील सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर करीत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!